प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
बार्शी : २२ / जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय व त्यामधील जनशक्ती मजदूर सभा, मातंग पॅथर सेना, अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती,दलित पॅंथर बार्शी,माथाडी संघटना, महिला आघाडी सेना कडून सरकारी कामगार अधिकारी यांच्या बार्शी कामगार ऑफिस ला घेराव घातला होता. स्मार्ट कार्ड द्यावे आणि कामगारांच्या योजना कामगारांना द्याव्या यासाठी आंदोलन केले गेले. त्या आंदोलनाला यश आले असून आदरणीय कामगार आयुक्त निखिलजी वाळके आणि आदरणीय सरकारी कामगार अधिकारी अशोकजी कांबळे यांनी आंदोलन ला मान देऊन बार्शी मध्ये स्मार्टकार्ड सुद्धा देण्यास चालू केलेले आहे.तसेच परवा दिवशी पासून कामगारांसाठी मध्यान योजना म्हणजे मोफत जेवण दिले जात आहे .
कामगारांचे आरोग्य व्यवस्थित राहावे शरीर बळकट राहावे म्हणून ही योजना अत्यंत चांगली असून सरकार आणि प्रशासनाचे
आम्ही आभार मानतो. जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय मधील पुणे, सोलापूर आणि मुंबई मधील संघटनांनी यामध्ये निवेदन देणे,तक्रारी करणे आणि चर्चा करणे यासाठी फार मोठे योगदान दिलेले आहे त्यामुळेच आम्हाला बार्शी मध्ये मध्ये मध्यान योजना आणि कामगारांची पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे. जास्तीत जास्त कामगारांनी यामध्ये हे लाभ घ्यावा अशी आम्ही जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि त्यामध्ये असलेल्या सर्व संघटनांकडून आवाहन करतो.

आदरणीय कामगार आयुक्त निखिलजी वाळखे साहेब व सह आयुक्त मा. अशोकजी कांबळे साहेब यांनी सर्व संघटनांना मान देउन स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. कामगारांना दोन वेळेस चे मध्यंन भोजन योजना चालू केले आहे. महिला घरकाम कामगारांच्या नोंदणी चालू झाले आहेत. त्याबद्दल निलेश मुद्दे व सुरेश चकोर यांनी जनआंदोलन समन्वयंक सदस्य सर्व बार्शी तालुक्याच्या कामगारांच्या मार्फत आभार मानले.आणि सर्व कामगारांना आवाहन केले कि विशेष नोंदणी अभियान चालू झाले आहे तरी सर्व कामगारांनी नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले .