राहाता । प्रतिनिधी :-
आज 21आक्टोबर रोजी लद्दाख मध्ये हाॕट स्प्रिंग नावाचे १०ते १५ हजार कि.मी.ऊंचीच्या शिखरावर भारतीय पोलिस गस्त घालत असतांना चीनच्या भ्याड सैनिकांनी हल्ला केला. त्यावेळी आपल्या भारतीय पोलिस जवांनाना विर मरण आले. त्या दिवसा पासून पोलिस हुतात्मा म्हणजे स्मृती दिवस म्हणून शहिद पोलिसांना आदंरजली वाहिली जाते. म्हणून राहाता तालुका मुस्लीम सेवा संघा कडून शहिद पोलीसांना श्रद्धांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले.
त्या अनुषंगाने शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री गुलाबराव पाटील, उप पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी यांचा सत्कार राहाता तालुका अध्यक्ष मुस्लिम सेवा संघ.मा.रोटरी क्लब अध्यक्ष गफ्फारखान पठाण , हजरतअली सय्यद , इम्रान शेख नदीम पठाण यांच्या वतीने करण्यात आला.

