श्रीरामपूर । प्रतिनिधी:- येथील ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा मेळावा व मार्गदर्शन आणि पदग्रहण सोहळा सोहळा समारंभ येत्या रविवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ठिक २ वाजता येथील बाजार तळावरील प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय संगमनेर रोड श्रीरामपूर येथे पार पडणार आहे.
या जिल्हा मेळाव्याचे अध्यक्षपदी तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अंसारी हे उपस्थित राहणार आहे तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीऑर्गनायझेशनचे प्रमुख प्रवक्ते मौलाना मिर्झा अब्दुल कयूम नदवी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार लहु कानडे,नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,उपनगराध्यक्ष करण ससाणे, श्रीसाईबाबा संस्थान शिर्डीचे विश्वस्त सचिन गुजर, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मोहम्मद रफिक बागवान ,नाशिक जिल्हाध्यक्ष तन्वीर खान तांबोळी, संगमनेरचे हाजी शफीभाई तांबोळी, गरीब नवाज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक मुक्तारभाई शहा, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात जिल्हा भरातून संघटनेचे पदाधिकारी तसेच मान्यवर व नवीन पदाधिकारी यांचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या शुभहस्ते पदग्रहण समारंभ होणार आहे, तरी जिल्हाभरातील सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष हाजी फय्याजभाई बागवान, जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल इस्माईल काकर, जिल्हा संघटक जाकीरभाई शहा, जिल्हा सचिव इब्राहीम युसूफ बागवान ,जिल्हा सहसचिव अजीजभाई अत्तार,जिल्हा कार्याध्यक्ष आरिफभाई कुरेशी खाटीक, हाफिज युनूस जमादार, जिल्हा सल्लागार ॲड. हारूण यासीन बागवान, उपाध्यक्ष फय्याजभाई मुलाणी, कार्याध्यक्ष आरिफ काकर, तालुका संघटक अझहर जहागीरदार ,तालुका सहसंघटक शरीफ शेख, तालुका सचिव अतिक हनीफ तांबोळी, तालुका सहसचिव एजाज शहा (सर) यांनी केले आहे.

