shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा, 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद.!!

अत्यावश्यक सेवा वगळून बंद पाळला जातोय-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख..!! 
===================

प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी:-
उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना निर्दयीपणे चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.बीड जिल्ह्यात या बंद मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले,खासदार सौ.रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वात सहभागी होणार आहे.तरी या महाराष्ट्र बंद मध्ये बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते,जनतेने महाविकास आघाडीतील सर्व मिञ पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे.


11 ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंद विषयी माहिती देताना बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की,उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.महाविकास आघाडी सरकार मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर काँग्रेसने 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला.हा बंद पक्षाच्या वतीने आहे.


सरकारच्या वतीने नाही.मात्र महाविकास आघाडी मधील इतर मित्र पक्षासोबत देखील आम्ही बोलणार आहोत की,त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं,असे बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.महत्त्वाचे म्हणजे या बंद बाबत आयोजित पञकार परीषदेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.लखीमपूर घटनेबाबत महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने देखील याबाबत खेद व्यक्त केला आणि हुतात्मांना श्रद्धांजली वाहण्यात आली.भाजप क्रूरपणे वागून शेतकरी आंदोलन चिरडत आहे.अद्याप संबंधित आरोपींना अटक देखील झाली नाही.त्यामुळे याचा देखील आम्ही बीड जिल्ह्यात सर्वत्र निषेध करणार आहोत,असे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.शेतकऱ्यांचा पाठीशी काँग्रेस पक्ष नेहमीच उभा राहिला आहे,त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत,असे सांगून शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता जाहीरपणे दिसून आली,इंग्रजांच्या भूमिकेत भाजप दिसून आली,असे देशमुख म्हणाले.भाजप सत्तेचा दुरूपयोग करतोय,भारतीय जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडतोय.आज शेतकरी विरोधात भाजप वागत आहे.सत्ता असलेल्या राज्यात शेतकऱ्यांना चिरडले जात आहे.अद्याप आरोपींना अटक केलेलं नाही.उत्तरप्रदेशचे सरकार मोकळे सोडताय या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार ११ तारखेला बंद.अत्यावश्यक सेवा वगळून बंद पाळला जातोय.लखीमपूरची घटना ही दुर्दैवी आहे.अशी क्रूरतेची घटना आजपर्यंत कोणीही केलेली नाही.माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे असे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले.तरी या महाराष्ट्र बंद मध्ये बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते,जनतेने महाविकास आघाडीतील सर्व मिञ पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे.

================
close