पुणे-:( सुनिल भोसले)
आज सायंकाळी मनसे च्या दबंग म्हणून ख्याती असलेल्या सिंघम नगरसेविका माननीय रुपालीताई पाटील यांचा वाढदिवस रॉयल ग्रुप ने पुणे येथील ऑफिस ला साजरा करण्यात आला.रुपाली ताई यांच्या कामाचा धडाका सर्वांनाच माहित आहे.रॉयल ग्रुप साठी नेहमीच सहकार्य करणार असल्याचे रुपाली ताई पाटील म्हटल्या.रॉयल ग्रुप तर्फे भविष्यात आयोजित करण्यात येणार्या कार्याविषयी आणि स्री कर्तुत्व आदिशक्ती पुरस्कारा विषयी रॉयल मैनेजिंग डायरेक्टर नितीन झगरे यांनी चर्चा केली.
योगायोग असा की रॉयल किड्स ब्रँड अम्बेसिडर युवाक्षी पाटील यांचा ही वाढदिवस असल्यामुळे दोघींचा वाढदिवस रॉयल ग्रुप तर्फे मोठ्या धुम धडाक्यात पार पाडला. रुपाली ताई पाटील यांची मनसे उपाध्यक्ष म्हणून झालेली निवड आणि वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाला मराठी चित्रपट दिग्गदर्शक रामकुमार शेडगे सर,रॉयल आयोजक नितीन झगरे,रॉयल किड्स ब्रँड अम्बेसिडर युवाक्षी पाटील,ब्रँड अम्बेसिडर रेणुकाताई ठाणगे, नयनतारा कांचन ग्रुप श्रद्धा दराडे,मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष सुनिल भोसले सर, वास्तूतज्ञ नमिताताई पाटील,सागर पतंगे,योगिनी कोटे,मोनाली मोरे,सोनिया बिबवे,मानसी वाघ,पूनम सोनार,फोटोग्राफर शितल पासलकर,स्नेहल यादव,स्नेहल पुंगलिया,सौंदर्यवती रागिणी मोराळे, कॉस्युम डिझाईनर सुमैय्या पठाण यावेळी उपस्थित होते.

