shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकउपयोगी दर्जात्मक विकास कामे करण्याचा आपला प्रयत्न-अंकिता पाटील* -गोंदी-ओझरे ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांचे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

*लोकउपयोगी दर्जात्मक विकास कामे करण्याचा आपला प्रयत्न-अंकिता पाटील*
  -गोंदी-ओझरे ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांचे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
 इंदापूर प्रतिनिधी-
  राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोंदी-ओझरे गावाच्या विकासासाठी आज एकूण १६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या भूमिपूजन समारंभासाठी पंचायत समिती सदस्य प्रदीप मामा जगदाळे उपस्थित होते.
  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी ५ लक्ष रुपये निधी, स्थानिक विकास निधीतून गणेश मंदिर व लक्ष्मी आई मंदिर सुधारणा करण्यासाठी २.५० लाख, जिल्हा परिषद सदस्य १५ व्या वित्त आयोग निधीतून पाण्याची टाकी बांधकाम करण्यासाठी २.५० लक्ष व जनसुविधा योजनेतून नवीन स्मशानभूमी शेड बांधणे करिता ६ लक्ष रुपये मंजूर केले आहेत, असे एकूण १६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 
 यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व  ग्रामस्थ उपस्थित होते.
close