shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोरवाडी येथे वीज चोरीप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल..!!

नगर: नगर तालुक्यातील सारोळा कासार कक्षातील शाखा अभियंता संदीप विठ्ठल बराट यांनी वीज चोरी प्रकरणी धडक मोहीम हाती घेतली असून दिनांक  20/10/2021 रोजी सायंकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी  व 5 वाजून 50 मिनीटांनी भोरवाडी येथील रहिवासी श्री बबन भाऊ भोर व रवींद्र भास्कर भोर यांच्या विरुद्ध वीज कायदा 2003 कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की दिनांक   8/10/2021 रोजी शाखा अभियंता संदीप विठ्ठल बराट  आपले कर्मचारी घेऊन मौजे भोरवाडी तालुका नगर येथे वीज चोरी शोधण्यासाठी गेले असता श्री रवींद्र भास्कर भोर यांनी विजेच्या तारेवर आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे त्यांना आढळून आले श्री रवींद्र भास्कर भोर यांनी एकूण  विद्युत भार भर 1625 युनिटची विजचोरी केली आहे त्याची रक्कम 14930 व कलम 152 प्रमाणे तडजोड रक्कम 4000 अशी एकूण 18930 इतक्या रकमेची विजचोरी केलेली आहे अशी फिर्याद संदीप विठ्ठल बराट यांनी दिल्यावरून रवींद्र भास्कर भोर यांच्या विरुद्ध  अहमदनगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 583 भारतीय विद्युत कायदा 2003 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला तसेच दिनांक 11 /10/ 2021 रोजी टाकलेले धाडीमध्ये श्री बबन भाऊ भोर यांनी त्यांच्या घरासमोर असलेल्या विजेच्या पोलवर आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे संदीप बराट यांना आढळून आले श्री बबन भाऊ भोर यांनी 1083 युनिट वीज चोरी केली आहे.

त्याची रक्कम 10300 व कलम 152 प्रमाणे तोडजोड  रक्कम 6000 अशी 16300 इतक्या रकमेची विजचोरी केली अशी फिर्याद संदीप विठ्ठल बराट यांनी दिल्यावरून अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 582  भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 नुसार  बबन भाऊ भोर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सब इंस्पेक्टर राजेंद्र अशोक सानप करत आहेत.
close