अहमदनगर प्रतिनिधी :
सोशल तरुणाई फाऊंडेशनच्या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये "मायेची ऊब" उपक्रम महाराष्ट्रभर पोहोचतोय. महाराष्ट्रामधील प्रमुख २५ शहरांमध्ये २५ टीम काम करत आहे. या सोबत डेमॉक्रॅटिक इंडियन व ग्रुप डायनॅमिक वेल्फेअर असोसिएशन ही एनजीओ देखील या उपक्रमाला सहकार्य करीत आहेत.
आपण पाहत आहोत की, नवरात्र संपली, आपण नवे कपडे साड्या घेतलेत. पण समाजामध्ये असाही एक घटक आहे ज्यांना आपलं पूर्ण शरीर जपण्यासाठी साधं कपडेही मिळत नाही अशा आपल्या निराधार माणसांचं काय ? हा विचार करून "सोशल तरुणाई फाऊंडेशन" ने मायेची ऊब हा उपक्रम हाती घेतला आहे. ह्यात स्त्रियांसाठी साड्या, लहान मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी विविध ठिकाणावरून जमा करून निराधार लोकांपर्यंत पोहचवण्याच काम तरुणाई टीम व सहकारी करत आहेत.
सोशल तरुणाई फाउंडेशन प्रसिद्धी प्रमुख तुषार महाजन म्हणाले की, आपण सारे माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करतोय. याच माणूसपणाच्या अनुषंगाने सामाजिक भान ठेवून आपण "सोशल तरुणाई फाऊंडेशन" च्या संकल्पनेच्या माध्यमातून "मायेची ऊब" हे उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमांमध्ये आम्हाला तुमची साथ हवीये असे ते म्हणाले.
या उपक्रमासाठी दिनेश राठोड, तुषार महाजन, गणेश आढाव, आकाश धुमाळ, प्रतिक्षा पाटील, अनिकेत शेळके, चंचल संगीता सुनिल, निशा मेश्राम, मानसी मालप, रोशनी चव्हाण, अंकिता मोहिते, निलेश पवार, संकेत शेट्ये, सिद्धाई भोसले, सायली मोरे, पृथ्वी तलोकर, सखी कुलकर्णी, पार्थ लोहके,सूर्याजी भोसले महाराज, भारतीताई महाराज, साक्षी डेरे, उत्कर्ष झावरे, अभिषेक देसाई, अमोल करनाकर, लव जाधव, गणेश माटे, सुरेश राठोड, या तरुणांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन निराधारांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न करीत आहेत
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, तुमच्या कडील नवे किंवा जुने कपडे आमच्या पर्यंत पोहचवा. तुमची मदत निराधार लोकांपर्यंत पोहचेल असे आवाहन सोशल तरुणाई फाउंडेशनचे संस्थापक दिनेश राठोड यांना केले आहेत. अधिक माहितीसाठी दिनेश राठोड - ७३९१९३९८४६ यांच्याशी संपर्क करून तुमची मदत पोचवू शकतात.

