shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे यांनी प्राचार्य कुंभार व पर्यवेक्षक पिसे यांचा सत्कार करून केले अभिनंदन.

राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे यांनी प्राचार्य कुंभार व पर्यवेक्षक पिसे यांचा सत्कार करून केले अभिनंदन.

इंदापूर प्रतिनिधी: (४ ऑक्टोबर २०२१)इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्या प्राचार्य पदावर(१ ऑक्टोबर) रोजी  पदभार स्वीकारलेले एच. जी. कुंभार व पर्यवेक्षक एम. एन . पिसे यांचा सत्कार  व अभिनंदन राष्ट्रवादी-काँग्रेस इंदापूर तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे यांनी  केले.

यावेळी शिवाजीराव पानसरे म्हणाले की,  हरहुन्नरी व्यक्तिमत्व, सामाजिक ,शैक्षणिककार्यात अखंड वालचंदनगर वासियांना कधीही कोणत्याही अडचणीस धावणारे म्हणजेच कुंभार सर होय. लहान समवेत लहान होऊन वृद्धांचा समवेत वृद्ध होऊन जात पात धर्म याचा कधीही न विचार करणारे हे व्यक्तिमत्व आणि वालचंद नगर मधील आम्हा शिक्षकांना सतत प्रेरणादायी व स्वयंशिस्तीची चे आमच्याशी प्रेमाने सहकारी म्हणून कायम कार्यरत असणारे, गेली २९ वर्ष या विद्यालयात कार्यरत असणारे असे प्राचार्य पदावर विराजमान झालेले आमचे मित्र सहकारी त्यांचा कार्यकाळ अत्यंत उंचावत जावो. त्यांच्या प्राचार्य पदास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
close