shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनईत मारामारी प्रकरणी ९ आरोपी अटकेत नेवासा न्यायालयाने दिली तीन नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी.

 
 प्रतिनिधी । मोहन शेगर, 
सोनई :- सोनईत रस्त्यावर वाहन मागे पुढे घेण्याचा वादातून दि २५ रोजी दोन गटात मारामारी झाली होती त्यात चार जण गंभीर जख्मी झाले होते. 

या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते. येथील आंबेडकर चौक परिसरात सोमवार दि २५ रोजी दोन गटात तुफान मारामारी झाली होती. येथील घटनेला जातीय वळण देण्याचा प्रयत्न झाला, मात्र शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळुन कांहीं विपरित घटना घडू दिली नाही. सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र करपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत दोन दिवसांत सोमनाथ लांडे,संदिप कर्डीले, शहाबुद्दीन शेख,शहेनाज शेख, नामदेव कोरडे, नासिर पठाण इरफान शेख,फिरोज पठाण, कलीम पठाण या ९ आरोपी ना अटक केली.

अटक आरोपींना नैवासा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
close