हा वृक्ष मराठीत खैर हिंदीमध्ये कथ्था, खैर तर संस्कृतमध्ये खदिर, इंग्रजीमध्ये Cutch, Khayer या नावाने ओळखला जातो.
खैराचे लाकूड, साल व डिंक याचा वाफर औषधी म्हणून केला जातो.
खैराच्या सालीचा काढा रक्तातील पित्तदोष, दातांची मजबुती, त्वचारोग, जखमा धुण्यासाठी, कुष्ठरोगावर लावण्यासाठी, अशक्तपणात शक्ती येण्यासाठी, गर्भाशयाची शिथिलता घालविण्यासाठी, जुना ताप घालविण्यासाठी तसेच खोकल्यावर, घशाच्या आजारावर बहुगुणी आहे.
खैराचे लाकूड उकळून त्याचा काथ तयार होतो. हा काथ बाळंतपणानंतर दूध येण्यास तसेच स्तनांना पुष्ठता येण्यास, पित्त विकार दूर करण्यास, धूपणी रक्तस्त्राव बंद करण्यास उपयुक्त आहे. खैराच्या सालीचे दंतमंजन करतात. या झाडावर लाखेचे किडे ही पोसले जातात. खायचा रंग म्हणूनही काथ वापरला जातो.
खैराचे झाड सर्वत्र आढळते याच्या औषधी गुणधर्माची ओळख करून या व आपल्या मित्रांना हे औषधी गुणधर्म सांगा. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरता मोहिमेत सहभागी व्हा.
लेखक : चंद्रकांत शहासने, निसर्गोपचारक.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या पर्यावरण साक्षरता मोहिमेंतर्गत प्रसारित

