shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (११०) औषधी वृक्ष : कोकम..!


कोकम या वृक्षाला मराठीत रातांबा, आमसूल, कोकम, हिंदीमध्ये साराम्ल संस्कृत मध्ये वृक्षाम्ल तर इंग्रजीमध्ये Kokum butter, Goa butter असे म्हणतात. 

कोकमाच्या फळांचा व बियांचा वापर औषधासाठी करतात व क्वचित प्रसंगी पाने व साल देखील औषध म्हणून वापरले जाते.कोकम या वृक्षाच्या फळाला कोकम, रातांबा तर फळाच्या सुकवलेल्या कापास आमसूल असे म्हणतात.

कफ, पित्त आणि वातनाशक अशा या बहूमोली कोकम फळाच्या गरापासून सरबत तयार केले जाते. हे सरबत चविष्ट, तृषानाशक, पित्तनाशक, पाचक असते.

कोकमाच्या बी मध्ये दहा टक्के तेल असते हे तेल घट्ट मेणासारखी असते. याला कोकम तेल, भिरंडेल असे म्हणतात. हातापायावरील भेगा जळवात, जळजळ यासाठी हे तेल लावतात. ओठाला लिपस्टिक म्हणूनही याचा वापर होतो. कोकमाच्या आमसुलापासून सोलकढी हे पित्तनाशक, पाचक असे सरबत बनवतात. अतिसार, रक्तीआव, मुळव्याध, पोटातील वायू गोळा यावर आमसूल तसेच कोकमाची कोवळी पाने औषधी म्हणून वापरतात. 

वृक्ष संवर्धन हे पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे आहे. वृक्षांचे औषधी गुणधर्म समजून घ्या व इतरांना सांगा. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरता अभियानात सहभाग नोंदवा.
कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्टच्या विद्यमाने पर्यावरण साक्षरता अभियानांतर्गत प्रसारित.

लेखक : चंद्रकांत शहासने. निसर्गोपचारक
मोबाइल क्रमांक ९८८१३७३५८५
close