इंदापूर पोलिसांची यशस्वी कामगिरी..जनावरे चोरणाऱ्या चोरीचा केला पर्दाफाश.
चोरीचे एकुण ७ गुन्हे उडकीस एकुण ६ लाख ४० हजार रू. किंमतेचा मुद्देमाल हस्तगत.
इंदापूर प्रतिनिधी: (दि.६ ऑक्टोबर २०२१) इंदापुर पोलीसांनी जनावरे चोरणाऱ्या चोर टोळीचा पर्दाफाश करून चोरीचे एकुण ७ गुन्हे उडकीस आणले असून त्यामध्ये एकुण ६ लाख ४० हजार रू. किंमतेचा मुद्देमाल सदर आरोपीकडुन हस्तगत करून धडाकेबाज कारवाई केली आहे.
इंदापुर पोलीस स्टेशन हददीत मागील तिन ते चार महिन्यांपासून दाखल असलेल्या जनावरे चोरीच्या गुन्हयाच्या अनुशंगाने इंदापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टि.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. जी. पाटिल व त्यांचे पथक यांनी आरोपी टोप्या उर्फ पिंटया आलेकर (वय २९ वर्ष) व त्याचे इतर तिन साथीदार रा. माढा ता. माढा जि. सोलापुर या टोळीला शिताफिने ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी करून इंदापुर पोलीस ठाणे अंतर्गत वेगवेगळ्या गावातील शेळया, बोकड, जर्शी गाई, म्हशी अशी जनावरे चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर बाबत अधिक तपास केला.
सदर आरोपींकडून एक बुलेरो पिकअप किंमत अंदाजे ४,००,०००, एक म्हैस किंमत ३५,०००, दोन जर्शी गायी किंमत अंदाजे ९०,००० व इतर वेगवेगळी जनावरे विकुन आलेले १५,००० रु. असा एकुण ६,४०,०००/-रू किंमतीचा मुद्देमाल सदर आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीकडून इंदापूर पोलीस ठाणेचे एकुण ७ गुन्हे उघडकीस अणण्यात इंदापुर पोलीसांना यश आले आहे.
सदर बाबत इदापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. जी. पाटिल, सहायक फौजदार तांबे, पो. हवालदार वाघ, पो.नाईक नगरे, पो.नाईक कदम, पो.नाईक कळसाईत , पो.हवालदार शिंदे, सहायक फौजदार काझी, पो.नाईक आटोळे, पो.नाईक गायकवाड, पो.शिपाई सय्यद, पो.शिपाई राखुंडे इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमून सदर गुन्हे उपडकीस आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच जनावरे चोरीच्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्यात आली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास डॉ. अभिनव देशमुख (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), मिलींद मोहिते (अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग), गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग), तयुब युनूस मुजावर (पोलीस निरीक्षक इंदापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.जी. पाटिल व त्यांचे पथक हे करत आहेत.

