एमपीएससी परीक्षेत पूजा पानसरे राज्यात मुलींमध्ये प्रथम
समस्त वंजारी बांधवांकडून भिगवण येथे भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: (६ ऑक्टोबर २०२१)महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये वनसेवा परीक्षेत राज्यातून मुलींमध्ये प्रथम क्रमांक कुमारी पूजा भाऊसाहेब पानसरे यांनी मिळविला त्यांचा समस्त वंजारी बांधवांकडून भिगवण येथे भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन(दि.५ ऑक्टोबर) रोजी करण्यात आले होते. या प्रसंगी इंदापूर बारामती तालुक्यातून वंजारी समाज बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी मारुतीराव वनवे, श्रीमंत ढोले ,नानासाहेब दराडे, दादासो वनवे, पांडुरंग दराडे, सोमनाथ चौधर, हरिभाऊ घोळवे, मच्छिंद्र चौधर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव पानसरे सर आयोजक यांनी केले. तर सूत्रसंचालन कैलास वनवे गुरुजी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार नंदकुमार बापू पानसरे यांनी मानले.

