shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात ऑलिम्पियन गोल्ड मेडल लिस्ट सुभेदार नीरज चोप्रा क्रिडा वाचनालय भव्य उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न"


पुणे:-खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा  व सुदृढ नागरिक निर्माण व्हावेत आणि आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःचे व राष्ट्रीय नीतिमूल्य जोपासली जावीत अधिकाअधिक प्रावीण्य पदके मिळावीत म्हणून श्रीमती लता काकू राजगुरू (कार्यशील नगरसेविका, पुणे म.न.पा.) यांच्या संकल्पनेतून व अभिमन्यू सुर्यवंशी यांचा सहकार्याने महाराष्ट्र राज्यातील क्रीडा क्षेत्रातील पहिले भव्य वाचनालय ओलंपियन गोल्ड मेडल लिस्ट सुभेदार नीरज चोप्रा क्रीडा वाचनालय यांचे उद्घाटन मा. कॅप्टन गोपाल देवांग (अर्जुन पुरस्कार विजेते) व मा.मनोज पिंगळे (ओलंपियन बॉक्सर व अर्जुन पुरस्कार विजेते) मा. सिलोन अँड्रोज सर (ज्येष्ठ बॉक्सिंग कोच),मा. पद्माकर फड (शिवछत्रपती पुरस्कार विजेते),श्रीमती.लता काकू राजगुरू, मा.कुणाल राजगुरू (युवा नेते) यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर रोड हॉटेल डिलक्स शेजारी पुणे - १ येथे करण्यात आले.

त्याप्रसंगी मा.भरतकुमार व्हावळ (उपाध्यक्ष - महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना), मा.सातपुते मॅडम (वरिष्ठ पोलिस निरीक्षक )मा.विजय यादव (शिवछत्रपती पुरस्कार विजेते), मा.विजय गुजर (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच), मा.प्रवीण कपाटे (राष्ट्रीय मुष्टियोद्धा), मा. नजीर सय्यद (स्टेट टेक्निकल ऑफिशियल्स), भाऊसाहेब लांडगे (राष्ट्रीय खेळाडू), मा.तन्वीर शेख (आंतरराष्ट्रीय धावपटू), मा.संजय कांबळे (राष्ट्रीय धावपटू),बंडू गायकवाड (राष्ट्रीय मुष्टियोद्धा),कानिफनाथ जगदाळे (बॉक्सिंग कोच),लखन मोरे, (राष्ट्रीय हॉकी खेळाडू),सचिन राजगुरू (राज्यस्तरीय बॉक्सर), कैलाश परदेशी (बॉक्सिंग पंच),श्रीनाथ हगवणे (बॉक्सिंग पंच),सतीशजी गायकवाड (राष्ट्रीय अध्यक्ष),जमसु (सामाजिक कार्यकर्ते) सुनील भुईटे (सामाजिक कार्यकर्ते),महेंद्र कांबळे, सुगत शांतेय, सिद्धार्थ कांबळे (पुणे शहर अध्यक्ष) अमोल राजगुरू,संतोष शेलार, ॲन्थोनी वाकडे, शाम गायकवाड,महेश येंडाळे,सचिन सुडगे,(सामाजिक कार्यकर्ते),कैलास झेंडे, आकाश चव्हाण, दशरथ शेट्टी (सामाजिक कार्यकर्ते),आयुब नदाफ,अमर सावंत,मंगेश कांबळे, मुकेश गायकवाड, बाळू भालेराव, अन्वर शेख,अनिल शिंदे, आनंद भालशंकर,शाशिभाऊ निकाळजे,प्रेम जोगदंड,अंबादास कांबळे,विजय जाधव,शिलवंत वाघमारे,आप्पा बद्रे,अमित आल्हाट,प्रफुल कांबळे,महेश येनडाळे,तरी सर्व खेळाडू क्रिडा मार्गदर्शक, क्रीडाप्रेमी, व सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जनार्दन जगताप यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन अभिमन्यू सूर्यवंशी (संस्थापक आबईस् फाउंडेशन संचालित अभिमन्यू स्पोर्टस् अँकॅडमी) यांनी पार पाडले.
close