प्रकाशमुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
नवचेतना महिला उद्योग व नवचेतना महिला मल्टीप्लेस संस्थाची बदानामी केल्या मुळे ज्योती सहावे व विजया कांबळे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनीषा घुले यांनी केली आहे.
बीड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये मनिषा सिताराम घुले यांनी लेखी स्वरूपात मागणी केली आहे. ज्योती रामेश्वर सांबरे व विजया शाम कांबळे रा. केज या दोघी माझ्या संस्थेमध्ये काम करित होत्या व त्यांनी स्वता: संस्थेचा व नवचेतना मल्टीप्लस महिला संस्थेचा राजनामा दिला आहे.
तरी त्यांनी माझी व नवचेतना महिला संस्थेची बदनामी केली आहे जिल्हाधिकारी यांनी संबधीत महिलांवर योग्य ती कारवाई करावी. त्यांनी जाणीवपूर्वक बदनामी करणे थांबवावी.नसता नाहक संस्थेची बदनामी केल्यामुळे 10 कोटीचा बदनामी केल्याचा खटला दाखल केला जाईल असे मनिषा घुले यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी सामुहिक राजीनामे सुद्धा दिले आहेत.
पण जाणीवपूर्वक संस्थेची बदनामी करणाऱ्या लोकांवरती कारवाई करावी. उपोषणाला बसलेल्या महिलांचा या संस्थेचा संबंध नाही त्यांचे अगोदरच सामूहिक राजीनामे दिले आहेत. असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मनीषा घुले यांनी म्हंटले आहे.
ज्योती सांबरे व विजया कांबळे यांनी स्वतः होऊन पतसंस्थेचे राजिनामे दिले आहेत. व त्या सातत्याने नवचेतना संस्थेची व माजी नाहक बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. ___
मनिषा घुले नवचेतना संस्था संचालिका

