shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी भरीव मदत करण्‍याचे .ना.नितीनजी गडकरी साहेब यांचे आश्‍वासन..!!

शिर्डी हे श्री साईबाबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे समाधीस्‍थळ आहे. शिर्डी येथे देश विदेशातून दररोज मोठ्या प्रमाणात साईबाबांचे समाधीचे दर्शनासाठी साईभक्त येत असतात. शिर्डी येथे दररोज सुमारे एक लाख साईभक्‍त दर्शन घेतात. तसेच श्री साईबाबांचे उत्सव काळात उदा. रामनवमी, गुरुपौर्णिमा व विजयादशमी या दिवशी व शनिवार, रविवार यासारख्या महत्‍वाच्‍या दिवशी साईभक्‍तांची संख्या तीन ते पाच लाखावर असते. वर्षभरात सुमारे 3 कोटीपेक्षा जास्त भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी येत असतात. 


शिर्डीत येणा-या भाविकांना पुरेशा प्रमाणात मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. शिर्डी नगरपंचायतचे उत्पन्नाचे स्त्रोत अत्‍यंत कमी असल्याने शिर्डी शहरामध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अडचणी येतात.
           

केंद्र शासन पुरस्कृत पर्यटन मंत्रालय,  भारत सरकार यांचे स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत भाविक व पर्यटक यांना सुविधा मिळण्यासाठी व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 100 टक्के अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत शिर्डी शहरासाठी निधी मिळण्यासाठी शिर्डी नगरपंचायतने प्रारूप प्रकल्प अहवाल (DPR) तयार केलेला आहे.
        
 
सदर प्रारुप प्रकल्‍प अहवालामध्ये शिर्डी हद्दीतील अहमदनगर-मनमाड रस्त्याचा विकास करणे, पादचारी मार्ग तयार करणे, नगर-मनमाड रस्त्यास स्वागत कमाणी करणे, टोल प्लाझा उभारणी करणे, रस्ता दुभाजक बांधकाम करणे, वृक्ष सर्वधनासाठी पाणी पुरवठा ठिबक योजना करणे, शिर्डी शहरामध्ये भुयारी विद्युत वाहिन्या टाकणे, पथदिवे उभारणी करणे, सिसीटीव्ही कॅमेरे वायफायसह, लँडस्केपींग, बगीचा व वृक्ष लागवड करणे, कचरा कुंडया, बॅचेस लावणे, पिण्याचे पाणी एटीएम उभारणी करणे, स्काय वॉकची उभारणी करणे, तसेच भाजी बाजार, बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे, सभागृह बांधकाम करणे, भाजी बाजार व मासे/मटन मार्केटची उभारणी करणे इत्यादी कामांचा समावेश केलेला आहे. 

सदर कामांचा प्रारूप प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी पर्यटन मंत्रालयाकडे सादर करण्यासाठी नगरपंचायतने विशेष सभा दिनांक 22.09.2021 ठराव क्रमांक 02 अन्वये मंजुरी दिलेली आहे. सदर कामांसाठी अंदाजीत 411 कोटी रकमेची आवश्यकता लागणार आहे.  
       

शिर्डी नगरपंचायतद्वारे सादर केलेल्‍या प्रारुप प्रकल्प अहवालास मान्यता मिळून देऊन निधी उपलब्ध करून देणेबाबत शिर्डी नगरपंचायतचे नगराध्‍यक्ष श्री शिवाजी अमृतराव गोंदकर यांनी मा.ना.श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील व खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचे मार्गदर्शन व  सुचनेनुसार सुमारे 411 कोटी रुपये किंमतीचा शिर्डी  शहर विकास प्रकल्‍प मा.ना.श्री नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार यांना दि.04/10/2021  रोजी  नाशिक  येथील कार्यक्रमात  सादर केला आहे.  

सदर प्रारुप प्रकल्‍प अहवालाबाबत सकारात्‍मक विचार करुन शिर्डी शहरासाठी जास्‍तीत जास्‍त निधी उपलब्‍ध करुन देणेबाबत तसेच सदर प्रस्‍तावास गती मिळणेसाठी मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व मा.मंत्री महोदय श्री नितीनजी गडकरी साहेब यांचेशी समक्ष चर्चा करुन पुढील कार्यवाही गतीमान करुन प्रत्‍यक्ष योजना अंमलात आणणेसाठी मा.ना.श्री  राधाकृष्‍णजी  विखे पाटील यांचे अध्‍यक्षतेखाली शिर्डी शहरातील प्रमुख प्रतिनिधींचे  शिष्‍टमंडळ लवकरात लवकर भेट घेणार आहे. 
       

सदर प्रारुप प्रकल्‍प अहवाल सादर करतेवेळी भाजपा उदयोग आघाडीचे प्रदेश अध्‍यक्ष श्री प्रदीपजी  पेशकार, भाजपा शहर अध्‍यक्ष श्री सचिन शिंदे, भाजपा युवा मोर्चा चे श्री गणेश जाधव, भजपा जिल्हा कोषाध्यक्ष श्री रमेश बिडये आदी उपस्थित होते.
close