प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- आज दुपारी १२.३० वाजता एरंडोल तहसील कार्यालय येथे वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या दालनात लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांच्या उपस्थितीत मिटिंग संपन्न झाली.
फोटो ओळ :- तहसील कार्यालयात वात्सल्य समितीची बैठकीत तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्याशी चर्चा करतांना प्रतिभा शिंदे व इतर
ह्या मिटिंग मध्ये लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांनी सांगितले की एरंडोल तालुक्यात कोरोना मुळे पती ,मुलगा गमावलेल्या निराधार महिला व एक पालक वा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्व्हे करावा,अश्या निराधार महिलांना तात्काळ अन्न सुरक्षा योजनेचा लाभ,निराधार पेन्शन योजना ,तहसील कचेरीवर कुटुंब सहाय्य योजने अंतर्गत वीस हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत,ज्या महिलांकडे आपल्या पतीच्या मृत्यू नंतर कागदपत्र उपल्ब्ध्द नसतील तर तात्काळ कॅम्प लावून दाखले व संबंधित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावेत ,एकल महिलांकडे कुठले कौशल्य असल्यास त्यांना संबधित विभागाच्या योजना मिळवून देण्याची शिफारस “वात्सल्य समितीने “ करावे , समृध्द गाव विकास योजना मनरेगा अंतर्गत योजनांचा लाभ देण्यात यावा,ज्या महिलांच्या कडे शेती आहे त्यांना शेती पूरक उद्योगांना अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळावे ,सुप्रीम कोर्टाच्या निकाला प्रमाणे सर्वाना 50 हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे , तालुक्यात एक पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ बाल संगोपन अनुदान महिना १२५० रुपये देण्यात यावे व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ पाच लाख रुपयाची मदत देण्यात यावी
आजच्या बैठकीत तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या सोबत , ग्रामविकास अधिकारी ,लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे,नगरसेवक डॉ सुरेश पाटील, कार्यकर्ता सुप्रिया चव्हाण, तेजस्विता जाधव,रेवानंद ठाकूर,सुनिल मराठे,गजानन महाजन,किरण बोरसे, यांच्या सह कोरोना मुळे विधवा झालेल्या एकल महिला हे उपस्थित होते.ह्या वेळी तहसिलदारांनी गावनिहाय सर्व्हे 8 दिवसात पूर्ण करण्याचे व सर्वाना रेशनीग व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देत दिनाक २१ तारखेला सर्व महिलांच्या कागदांची पूर्तता करण्या साठी कॅम्प ठेवण्यात आला आहे.तसेच पुढील दर पंधरा दिवसातून एकदा मिटिंग घेण्याचे आश्वासन देत मिटिंग सर्वांचे आभार मानत संपन्न झाली.

