shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विखरण ता.एरंडोल येथे एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या-आत्महत्येचे कारण समजू शकले नाही..!


प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- तालुक्यातील विखरण येथे 35 वर्षीय नागरिकाने घरातील लाकडाच्या कडीला सूती दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.
     याबाबत सविस्तर माहिती अशी की विखरण ता एरंडोल येथे ज्ञानेश्वर कौतिक आहिरे वय 35 वर्षे त्याची पत्नी आशाबाई व दोन मुले यांचेसह राहतो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दोघे पती-पत्नी हे इतर शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करतात. पत्नी आशाबाई ही सुरेश सिताराम अहिरे यांच्या शेतात कामावर गेली होती सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पत्नी आशाबाई ही घरी आली असता घराच्या दरवाजा आतून लावलेला होता म्हणून दरवाजा ठोकून, आरडाओरड करून सुद्धा दरवाजा न उघडल्यामुळे हिरालाल अहिरे, राजेंद्र पाटील, रवींद्र अहिरे यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता समोर  ज्ञानेश्वर कौतिक अहिरे याने घरातील  लाकडाच्या कडीला दोर बांधून गळफास घेतलेला दिसून आला म्हणून त्यास तात्काळ खाली उतरून ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे करण्यात आले त्या ठिकाणी डॉ. तन्मय महाले डॉ.मुकेश चौधरी यांनी तपासले असता ज्ञानेश्वर हा मयत झाल्याचे घोषित करण्यात आले. शनिवारी सकाळी मयत ज्ञानेश्वर यावर शवविच्छेदन करून विखरण येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
मयत ज्ञानेश्वर आहिरे हा वडिलांपासून वेगळा राहतो त्याचे आई वडील हे अकुल्खेडा तालुका चोपडा येथे आपल्या मुलीकडे पंधरा दिवसापासून गेले होते. मयत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी, 9 व 7 वर्षे वय असलेली लहान दोन मुल आहेत. इतर नागरिकांच्या शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या ज्ञानेश्वर ने का आत्महत्या केली याचे कारण समजू शकले नाही.
याबाबत एरंडोल पोलीस स्थानकात उशिरा रात्री इलाल आत्माराम अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार  काशिनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहे
close