shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने आवाहन...!



अहमदनगर :- अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान विभागामार्फत
दि.9/10/2021 ते दि.10/10/2021 कालावधीत बीजेचा कडकडाट व वादळी वा-यासह अतिवृष्टी व वीजा पडणेची शक्यता वर्तवीलेली आहे. दि.4/10/2021 रोजी दुपारी 12.00 वा. अहमदनगर जिल्हयातून वाहणा-या गोदावरी नदीस नाशिक जिल्हयातील नांदुरमधमेश्वर बंधा-यातून 6,310 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे व भिमा नदीस पुणे जिल्हयातील विविध धरणांच्या विसर्गामुळे दौंड पुल येथे 8,222 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच जिल्हयातील भंडारदरा धरण व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. तर ओझर बंधा-यातून प्रवरा नदीपात्रात 1,093 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मुळा धरणातून मुळा नदीपात्रात सदयस्थितीत 4,255 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

घोड धरणातून घोड नदीपात्रात 5,400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर
सिना धरणातून सिना नदीपात्रात 6,22 क्युसेस व सरी धरणातून 4,68 क्युसेंस विसर्ग सुरू आहे. जिल्हयातील
पर्जन्यमानामुळे वा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. 

जिल्हयातील नदीकाठच्या गावातील नागरीकांना
सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फ जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन करते. सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. 

नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा जोड नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जुनाट मोडकळीस
आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. धोकादायक झालेले ललावाचे क्षेत्रामध्ये राहण्या-या
नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची
शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्या-या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. 

घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष
खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उद्भवू शकतो. धोकादायक ठिकाणी थांबू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfee)काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विद्युतवाहीनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या विद्युत तारा, विद्युत खांबापासून दूर रहावे. 

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री). 0241-2323844वा 2356940 वर
संपर्क साधावा.
दि. ९/१०/२०२१
 
                                   (संदिप निचित)
                           निवासी उपजिल्हाधिकारी तथा
                              मुख्य कार्यकारी अधिकारी
                     जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,                                         अहमदनगर.
close