shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्ट शिरूर च्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने नवरात्र उत्सव कौतुकास्पद


प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :-
हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्ट  शिरूर गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात होता. 

परंतु  कोरोना महामारी चालू झाल्या पासून हनुमान नगर मित्र मंडळ व  ट्रस्ट  शिरूर गणेशोत्सव व नवरात्र उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचे मंडपाचे उभारणी न करता,कोणत्याही प्रकारचा देखावा,  कार्यक्रमाचे आयोजन गेल्या काही  वर्षापासून केले नाही. 

कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नागरिकाकडून वर्गणी जमा न करता मंडळाचे पदाधिकारी स्वतः खर्च करून गणेश उत्सव व नवरात्र उत्सव साजरा करत आहे.

यावर्षी गणेशोत्सव काळात मंडळाने कोणत्याही नागरिकाकडून वर्गणी घेतली नाही,सर्व खर्च हा हनुमाननगर मित्र मंडळ व ट्रस्टचे  शिरूर चे पदाधिकारी करत आहेत, गणेशोत्सव काळात सर्व नागरिकांना घरपोच  पेढ्याच्या प्रसादाचे  वाटप हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्टने केले. हे खूप कौतुकास्पद आहे. 

कालच नवरात्र उत्सव सुरू झाला, यावेळी घट  स्थापना व देवीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. 

नवरात्र उत्सव काळात शिरूर शहरातील हनुमाननगर मध्ये घटस्थापना देवीची पूजा या सर्व कार्यक्रमाचे नियोजन हे सर्व हनुमान नगर परिसरातील माता-भगिनी करत असतात, दांडिया व गरभा  चा कार्यक्रम होतो. 

 याही वर्षी हनुमाननगर शिरूर या भागात नवरात्र उत्सव  साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे,सर्व नियोजन महिला आनंदाने  व उत्साहाने  करून नवरात्र उत्सव साजरा करीत आहे. 

 मंडळाचे अनेक वर्षांची परंपरा चालू राहावी त्यात कोणताही खंड पडू नये. परंतु सामाजिक बांधिलकी जपत कोरोणाच्या पार्श्वभूमीवर हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्ट  कामगिरी खूप कौतुकास्पद आहे.
close