shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीतील विद्यालयांमध्ये 'जागतिक टपाल दिन 'उत्साहात साजरा

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीतील विद्यालयांमध्ये 'जागतिक टपाल दिन 'उत्साहात  साजरा.
इंदापूर  प्रतिनिधी:(९ ऑक्टोबर २०२१)आजच्या नेटवर्किंग   व सोशलमीडियाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांपासून  लोप पावत चाललेली पत्र लेखनाची कला तसेच पत्र लेखनाची आवड निर्माण होण्याकरिता,आपल्या मनातील भावना प्रत्यक्षदर्शी लेखी स्वरुपात मांडणे तसेच अंतरदेशीय पत्रांची ओळख व्हावी यासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व  प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल मधील  विद्यार्थ्यांनी इंदापूर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील अधिकारी तसेच संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार व सचिव यांना covid- 19 च्या काळामध्ये शाळा सुरू केल्याबद्दल व कोरोना महामारीच्या  काळात आपली कामगिरी उत्कृष्टपणे पार  पाळल्याबद्दल अभिनंदनपर पत्ररुपी शुभेच्छा दिल्या. या पत्रलेखनामुळे विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड, तसेच अंतरदेशीय पत्रांची ओळख करुन देण्यात आली. तसेच अगदी प्राचीन काळापासून चालत आलेला पत्रलेखनाचा इतिहास सांगण्यात आला. पत्रलेखन करण्यासाठी विद्यालयातील सौ.रेखा सुरवसे ,सौ.लता कचरे मॅडम,श्री. प्रवीण सर, श्री.निखिल मुळे सर व चित्रा बर्वे  मॅडम , निशा घाडगे मॅडम  यांनी सहकार्य केले.
close