नगर । प्रतिनिधी :-
अहमदनगर जिल्हयातील सर्व शिवभोजन केंद्रातील (Shivbhojan Center) अन्नाचा दर्जेबाबत तसेच थाळी बनवण्यासाठी बाजारातून लागणारे साहित्य सामग्री घेताना सदरील अन्न घटके खाण्या योग्य आहेत. याची नियमित तपासणी करण्यात यावी व ज्या केंद्रातील अन्नाचा दर्जा तसेच साहित्य गुणवत्ते नुसार नसल्यास त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी मॅडम यांनी सध्या निष्क्रिय असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाला यांना दिले आहेत.
सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब बाजीराव गायके यांनी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रातून देण्यात येत असलेल्या थाळीतील अन्नाचे दर्जाबाबत जिल्हा अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांनी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांची तपासणी केली असता शिवभोजन केंद्रातील अन्नाची दर्जेबाबत अन्न व औषधे विभागाकडून तपासणी झाली नसल्याचे आढळून आले.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने नगर जिल्हयातील शिवभोजन केंद्रातील अन्नाचा दर्जेबाबत तसेच थाळी बनवण्यासाठी बाजारातून लागणारे साहित्य सामग्री घेताना सदरील अन्न घटके खाण्या योग्य आहेत. याची तपासणी नियमित करण्यात यावी व ज्या केंद्रातील अन्नाचा दर्जा तसेच साहित्य गुणवत्ते नुसार नसल्यास त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत.
नगर जिल्ह्यातील जे शिव भोजनालय सुरुवातीपासून आजतागायत चालू आहेत .त्याची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली होती. त्यात अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने शिवभोजन केंद्रातील अन्नाची दर महिन्याला तपासणी, पडताळणी करुन ते खाण्या योग्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र पुरवठा कार्यालयाचे दप्तरी असणे गरजेचे होते. मात्र तशी कुठलीही तपासणी झालेली असल्याचे कुठलेही प्रमाणपत्र आढळून आले नाही.
यावरून एकंदरीत सध्या तरी असे दिसून येते की, अनेक वर्षांपासून अन्नाची तपासणी न करताच आज अखेरपर्यंत सर्व शिवभोजनालयातून अतिशय निकृष्ठ दर्जाचे अन्न देण्यात आले आहे. हे उघडच आहे. शासनाच्या अधिनियमांचे उल्लंघन करण्यात आले व शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे चौकशी करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी आमची हे प्रकरण निदर्शनास आल्यापासून मागणी होती...!
- काकासाहेब गायके, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते.

