shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

’यादें हफ़िज’ त्रैभाषीक मुशायरा उत्साहात संपन्न..!


जालना । प्रतिनिधी :- अखिल भारतीय लोकहित संघटना व कला क्रीडा दूत फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. इंजि. हफीजउल्ला दुर्राणी यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ ’यादें हफ़िज’ त्रैभाषीक मुशायराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जालन्याचे जेष्ठ शायर स. कासीम कालिब हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये जेष्ठ नेते इकबाल पाशा, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, प्राचार्य मो. इफतेखार सर व दुर्रानी सर यांच्या सुपुत्री डॉ. आर. सिद्दीकी तर प्रमुख पाहुणे म्हणून मो. अब्दुला सर, ईकबाल कुरेशी, समाज सेवक गणेश सुपारकर, माजी नगरसेवक मिर्झा अनवर बेग, सगीर पहेलवान, शिवसेना अल्पसंख्याक शहर अध्यक्ष जफर खान, मुस्लिम वंचित आघाडी चे अफसर चौधरी, माजी नगरसेवक बाळा परदेसी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. इंजि. हफीजउल्ला खान दुर्रानी तसेच गत वर्षात स्वर्गवासी झालेले शम्स जालनावी, दीपक परिहार, शमीम जोहर, डॉ. फहीम अहमद सिद्दीकी, हिंदी कवी खुशालचंद शोला यांना दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


यावेळी स्व. इंजि. हफीजउल्ला खान दुर्रानी यांची आठवण करत बशारत अली खान (हैदराबाद), शफी अहमद शफी, अलताफ इकबाल (परभणी), अब्दुल रज्जाक रहबर, लियाकत अली खान यासेर, प्रा. अशोक खेड़कर, खिज़र राही, नईम खान नईम, सुनील लोनकर दर्द, बशीरूद्दीन अल्लारखा, फ़ैज़ सुभानी आदि शायरांनी आपल्या रचना सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे संयोजक फैज सुभानी होते तर सुत्रसंचालन अ‍ॅड. मो. अशफाक कागजी व आभार प्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष शेख चाँद पी.जे. यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे बबन दादा सोरटी, शेख मतीन, मो. तारेख सुभानी, वसीम खान, अजीम खान, बशीर खान, सय्यद नासेर, शेख शफीक, संपतराज जांगीड, नितीन जाधव, शाहेद मणीयार, जावेद पठाण, शेख समीर आदिंनी परीश्रम घेतले.

close