shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साकत ग्रामस्थांच्या वतीने सिना नदीवरील पूल उभारणीचे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे सुपुर्त...!!

नगर प्रतिनिधी :-(शिवा म्हस्के)

साकत बुद्रुक येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी संदर्भात साकत बुद्रुक ग्रामपंचायत व साकत खुर्द ग्रामपंचायत व दोन्ही गावाच्या ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन आज सुवेंद्र गांधी यांच्या निवासस्थानी  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांच्या कडे देण्यात आले.



अहमदनगर जिल्हा व  बीड जिल्हा सिमा हद्दीतीवर सिना नदी   आहे. साकत बुद्रुक, साकत खुर्द या दोन्ही गावाच्या महसुली  हद्दीवरून सिना नदी आहे.
 
या सिना नदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पूर येतो असतो, पूर आल्या मुळे चार महिन्यांचा कालावधी मध्ये साकत ब्रुदुक, लोणी ,पिंपळा या नागरीकांना नदीला पूर आल्याने  संपर्क तुटला जातो.

 
या कालावधी मध्ये गावातील आजारी रुग्ण, गरोदर महिला, रोजगारा साठी, शालेय विद्यार्थी, यांची ये-जा या सिना नदी पात्रातुन असते. पण पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे पंधरा ते विस किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावीं लागते साकत बुद्रुक ग्रामपंचायत व साकत खुर्द ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या यांचा सिना नदीवर  पुल होणे दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. 
 

आज राष्ट्रीय महामार्ग भुमीपुजन लोकार्पण सोहळा  निमित्ताने ते नगर शहरात आले होते. 
यांचे औचित्य साधून या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे  साकत ग्रामस्थांची वतीने निवेदन देण्यात आले.
       
या वेळी साकत गावचे मान्यवर  ज्ञानदेव सासवडे , ग्रा.सदस्य  संतोष गुंड, सचिन भोगाडे, मधुकर भोगाडे, प्रवीण सासवडे, परमेश्वर भोगाडे, सोमेश भोगाडे, महादेव भोगाडे, सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के, दादा जाधव,  हषर्द थोरत, रामदास भोगाडे, वैभव भोगाडे,किरण भोगाडे संकेत सासवडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
close