प्रकाश मुंडे |बीड जिल्हा प्रतिनिधी:-
स्वातंत्र्याचा अम्रत महोत्सवा निमित्ताने केज तहसील येथे केज तलाठी सज्जा अंतर्गत मोफत डिजिटल ७/१२ चे वाटप नायब तहसीलदार (प्रभारी तहसीलदार) लक्ष्मण धस यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रपीता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार लक्ष्मण धस, मंडळ अधिकारी भागवत पवार, मन्मथ पटणे, तलाठी लहु केदार, नगरसेवक भाऊसाहेब गुंड, उपेंद्र शिंदे, सचिन राऊत, अशोक गुंड, संतोष गुंड, पापा गुंड, पठाण साहेब, नन्नवरे साहेब व पत्रकार प्रकाश मुंडे उपस्थित होते.
केज तलाठी सज्जा अंतर्गत प्राथमिक स्वरूपात मोफत डिजिटल ७/१२ चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी डिजिटल ७/१२ चे महत्त्व समाजावून सांगितले. या नंतर शेतकरी वर्गाला डिजिटल ७/१२ मुळे तलाठ्याकडे चकरा मारण्याची गरज राहणार नाही. एकदा सातबारा डिजिटल झाली म्हणजे आॅनलाईन कुठे पण काढून भेटेल. पैसा व इतर खर्च टळेल ही सातबारा तलाठी कार्यालयात प्रथम मोफत देण्यात येईल. तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी केले आहे. केज सज्जाचे कर्तव्य दक्ष तलाठी लहु केदार यांनी सर्व उपस्थित अधिकारी, शेतकरी व पत्रकार यांचे अभार मानले.



