शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा :
डाॅ.सतिष खर्डे यांनी अविरतपणे केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना सरपंच सेवा संघ यांचे वतीने दिला जाणारा "मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा" यावर्षीचा 'राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार 2021' नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
डाॅ.सतिष खर्डे हे भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी चे सदस्य व सह.प्रभारी कर्नाटक आणि तसेच डॉ खर्डे हे वर्तमान मध्ये अनेक संघठनामध्ये राष्ट्रीय स्तरावरील पदावर देखील काम करीत असून संगमनेर तालुक्यातील रायते मा.ग्रामपंचायत सदस्य आहेत.त्यांनी आजपर्यंत गोरगरिबांना विविध योजनांचा लाभ, शेतकर्यांना केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांचा लाभ , जलसंधारण विषयी मार्गदर्शन करुन शेतकरी बंधूना आर्थिक स्तर वाढविण्यासाठी सहकार्य, गरिबांना घरकुल योजनांचा लाभ, संजय निराधार योजना, श्रावणबाळ योजना, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांमध्ये अनेक कामगारांची नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, याचप्रमाणे अनेकविध कामे करण्यासाठी आतापर्यंत सामाजिक योगदान दिले आहे.
त्यांच्या या सामाजिक कामाची दखल घेत सदर पुरस्कार हा कोल्हापूर येथे 25 सप्टेंबर 2021 झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सन्मान श्री बाबासाहेब पावसे , श्री शंकरराव खेमनर , श्री जयदीप वानखेडे, श्री भाऊसाहेब मरगळे ह्या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. गोल्ड मेडल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातुन अभिनंदन होत आहे.

