shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हॉटेल व्यवसायात स्वच्छता ठेवणे अधिक महत्त्वाचे - ना. दत्तात्रय भरणे. इंदापूर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला लॉलीपॉप आणि चायनीज नूडल्सचा आस्वाद.

हॉटेल व्यवसायात स्वच्छता ठेवणे अधिक महत्त्वाचे - ना. दत्तात्रय भरणे. 

इंदापूर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला लॉलीपॉप आणि चायनीज नूडल्सचा आस्वाद.
इंदापूर प्रतिनिधी:(३ ऑक्टोबर २०२१)हॉटेल व्यवसायात स्वच्छता ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे .ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी ग्राहक आवर्जून आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहतात. असा अनमोल संदेश इंदापूर येथील बाबा चौक, पवार कॉम्प्लेक्स या ठिकाणी हॉटेल चायनीज टाऊन याच्या उद्घाटनाप्रसंगी हॉटेल मालक विकास जाधव यांना अनमोल संदेश देत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुभेच्छापर भाषणामध्ये आपले मनोगत व्यक्त केले. युवा व्यावसायिक विकास जाधव यांच्या चायनीज टाऊन हॉटेल चे उद्घाटन (दि.२ ऑक्टोबर २०२१) रोजी राज्याचे राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सायंकाळी ६.३० वाजता संपन्न झाला.
या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे,  आमचे मेंबर मित्र परिवार व वडार पॅंथरचे उपाध्यक्ष अनिल पवार,  इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी शहराध्यक्ष इंदापूर अनिल राऊत,माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,  इंदापूर नगर परिषद विरोधी पक्ष नेते पोपटराव शिंदे ,युवा नेते युवराज पवार, नगरसेवक अमर गाडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष वाशीम बागवान ,पिंटूसेठ घोडके, रोहिदास पवार, करण चौगुले, अक्षय वाघमारेआणि इतर मित्र परिवार उपस्थित होते.

उद्घाटनाप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, विकास आपण एवढ्या आत्मविश्वासाने बोलला आहात की ,याच आत्मविश्वासाने सर्व ठिकाणी शाखा होतील त्या शाखेसाठी माझी शुभेच्छा .तसेच ते पुढे म्हणाले की, हॉटेल व्यवसायात स्वच्छता ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी ग्राहक आवर्जून आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहतात. असा अनमोल संदेश देत विकास जाधव यांना तुझा मामा तुझ्याबरोबर आहेच पण हा मामा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही यावेळी देत त्यांनी या व्यवसायास शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी हॉटेल व्यवसायाचे मालक विकास जाधव म्हणाले की ,माझी स्वतःची रक्त लघवी तपासणी लॅब आहे. सध्या मला हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये  आवड असल्याने  मी चायनीज टाउन या हॉटेल ची निवड केली.  ग्राहकांना स्वच्छ आणि अनुभवी तज्ञ कुक यांच्यामार्फत गरम चायनीज पदार्थ इंदापूर शहरातील खवय्यांसाठी बनवून मिळाले पाहिजेत या संकल्पनेतून त्याच पद्धतीने आकर्षक असा प्रकाशमय असलेले चायनीज टाऊन हॉटेल तयार केले .असून यामध्ये फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तयार केलेली आहे.
 त्यामुळे उत्तम दर्जा आणि विनयशील सेवा देणारी चायनीज टाऊन याची निर्मिती आपल्या सर्व मित्र परिवाराच्या आशीर्वादाने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे आपण या कार्यक्रमास आलात त्याबद्दल विशेष सर्वांचे स्वागत करून आभार मानतो.

 यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  हॉटेल चायनीज टाऊन येथे उद्घाटनानंतर आयोजकांच्या आग्रहाखातर उपस्थित नागरिकांबरोबर घेतला लॉलीपॉप आणि चायनीज नूडल्स चा आस्वाद.
close