शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार,२७ ऑक्टोबर , २०२१
राहुरी कृषि विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या वर्षात शेतकऱ्यांसाठी एक लाख क्विंटल बियाणे निर्मिती करावी अशी सूचना कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केली, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटिल व संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांना दिल्या.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभासाठी (ता. २७) रोजी राज्याचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन झाले. निवडक शेतकरी संवादानंतर विद्यापीठाचे माहिती तंत्रज्ञान केंद्रास भेट देवून या ठिकाणी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनास देखील पाहणी केली. या सोबतच उद्यानविद्या विभागाच्या फळ पिकांची लागवडीची पाहणी केली. विद्यापीठाच्या औषधी व सुगंधी वनस्पती विभाग, उद्यानविद्या विभाग विद्यापीठाने विकसित केलेल्या इरिगेशन पार्क, बेकरी व कास्ट प्रोजेक्ट यांना भेट दिली.
विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये विद्यापीठाने नव्याने विकसित केलेल्या जातींचा व वाणांचा समावेश करून आकर्षक छायाचित्रांसह भित्तिपत्रके तयार करण्यात आलेली आहेत. अखिल भारतीय संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र, चारा व गवत संशोधन प्रकल्प, बियाणे प्रकल्प तसेच अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाद्वारे विद्यापीठाने विकसित केलेल्या नवनवीन वाणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक लक्ष वेधून घेत होते.
अत्यंत अल्पावधीत एवढा मोठा कार्यक्रम साजरा करण्याचे आव्हान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक सुखदेव बलमे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विद्यापीठाचे कर्मचारी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यस्त होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

