नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून नोकरी पेक्षा व्यवसायामध्ये दोन पैसे चांगले कसे मिळतील ही भूमिका कौतुकास्पद - हर्षवर्धन पाटील.
वडापुरी येथे लक्ष्मी किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानाच्या उद्घाटनास उपस्थित राहून आप्पासाहेब जगदाळे यांनी दिल्या शुभेच्छा.
इंदापूर प्रतिनिधी: उच्चशिक्षित असणारे विजय काळे हे नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून नोकरी पेक्षा व्यवसायामध्ये दोन पैसे चांगले कसे मिळतील ही भूमिका स्वीकारली त्याबद्दल त्याचे विशेष कौतुक करणे गरजेचे आहे. असे वडापुरी येथील लक्ष्मी किराणा अँड जनरल स्टोअर्स दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील उद्गार काढले.
वडापुरी येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी विजय काळे बावडा यांच्या लक्ष्मी किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानाचे उद्घाटन वडापुरी येथील काळे कॉम्प्लेक्स येथे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय शिर्के संचालक निरा भिमा सहकारी साखर कारखाना, भागवत काटकर, उपसरपंच विठ्ठल कदम, शिवाजी तरंगे, दत्तात्रय गायकवाड, अमोल चंदनशिवे, संतोष देशमुख, शत्रुघ्न बागल, सुनील जाधव, वैभव भारती, मंगेश देवकर, विलासराव चंदनशिवे, वामन नलवडे, दादासाहेब काळे, बापूसाहेब चंदनशिवे, धनाजी पाटील तसेच काळे परिवारातील हनुमंत काळे, योगेश काळे ,चंद्रशेखर लकडे, रावसाहेब काळे, विठ्ठल काळे ,बापू काळे, प्रवीण लवटे ,मनोहर शेंडगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील व उपस्थित मान्यवर यांचा सत्कार काळे परिवाराच्या वतीने करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, विजयादशमी आणि दसरा या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्तावर लक्ष्मी किराणा अँड जनरल स्टोअर या दुकानाचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो.
तसेच ते पुढे म्हणाले की, व्यवसायामध्ये उत्तम दर्जा, माफक किंमत आणि चांगली सेवा ग्राहकांना द्यावी. तसेच ग्राहकांचे समाधान होईल अशा पद्धतीचे आपले काम असले पाहिजे. आपल्या विश्वासा मध्ये कोणाची नाराजी येता कामा नये. एवढे सुत्र स्वीकारले तर व्यवसाय चांगला चालेल.
उच्चशिक्षित असणारे विजय हनुमंत काळे हे नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून नोकरी पेक्षा व्यवसायामध्ये दोन पैसे चांगले कसे मिळतील ही भूमिका स्वीकारली त्याबद्दल त्याचे विशेष कौतुक करणे गरजेचे आहे. असेच तरुण मुले याच पद्धतीने पुढे आले तर आमचे सहकार्य निश्चित पणाने राहील असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी लक्ष्मी किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा सत्कार दादासाहेब काळे यांनी केला.

