shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिगवण येथे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते फिल्टर पाणी प्लॅन्टचे उदघाटन* -भिगवन ग्रामपंचायतच्या वतीने तीन लाख रुपये कॉंक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

*भिगवण येथे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते फिल्टर पाणी प्लॅन्टचे उदघाटन*
 -भिगवन ग्रामपंचायतच्या वतीने तीन लाख रुपये कॉंक्रीट  रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
इंदापूर प्रतिनिधी:  स्वर्गीय रमेश(बापू) जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून पराग जाधव व रोहन जाधव यांनी भिगवण स्टेशन येथे २००० लिटर क्षमतेचे मोफत शुद्ध पाण्याचे फिल्टर पाणी प्लॅन्ट दिले आहे त्याचे आज निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले.यावेळी प्राथमिक स्वरूपात प्लॅन्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
 यावेळी भिगवन ग्रामपंचायतच्या वतीने तीन लाख रुपये कॉंक्रीट  रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे.
    पराग जाधव व रोहन जाधव यांनी स्वर्गीय रमेश(बापू) जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकासाठी राबवलेला उपक्रम स्तुत्य असून  लोकउपयोगी आहे असल्याचे मत निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
  भिगवन ग्रामपंचायतचे माजी सरपंच व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे नुतन संचालक पराग जाधव यांनी सांगितले की, स्वर्गीय रमेश जाधव उर्फ बापु यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकसेवेचा वसा कायम चालू ठेवला होता तोच वारसा पुढे आपण आपले नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक जोमाने पुढे चालू ठेवणार आहोत.
   यावेळी इंदापुर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे,इंदापुर अर्बन बँकेचे माजी चेअरमन अशोक शिंदे,
सरपंच तानाजी वायसे,उपसरपंच प्रतिनिधी पिंटु शिंदे, माजी उपसरपंच अभिमन्यु खटके,लालचंद रायसोनी, संजय रायसोनी,जयदीप जाधव,ज्येष्ठ माजी ग्रामपंचायत सदस्य गुलामभाई शेख,अनिल देसाई,विठ्ठल म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य कपिल भाकरे,आबा काळे,आप्पा पवार,सत्यवान भोसले, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी जमीर शेख,मच्छिंद्र खडके,जावेद शेख, दत्ता धवडे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close