सामाजिक बांधिलकी जपत
इंदापूर तालुक्यातील वंजारी समाज बांधवांकडून निंबोडीतील अपघातग्रस्त तरुणाला केली आर्थिक मदत.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील चि. विवेक उत्तम घोळवे या तरुणाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्या तरुणाची आर्थिक गरज ओळखून इंदापूर तालुक्यातील वंजारी समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत एकत्र येऊन १०,००० रुपयांची आर्थिक मदत जमा केली.ही मदत दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी निंबोडी या ठिकाणी जाऊन त्या तरुणाची आई सौ उषा उत्तम घोळवे यांच्याकडे सुपूर्त केली.
संकट काळात सामाजिक बांधिलकी जपणारे दानशूर व्यक्तिमत्व यामध्ये
ह.भ.प.आबासाहेब उगलमुगले ( लाखेवाडी ),हिरालाल पानसरे ( डाळज नंबर २ ) अध्यक्ष दैवत फाउंडेशन इंदापूर तालुका,
डॉ तेजस हांगे ( भोडणी ),
अरविंद आघाव सर ( निंबोडी ), सचिन पानसरे ( तावशी ) , अभिजीत पानसरे ( डाळज नंबर २ ), रामभाऊ सोने (डाळज नंबर २ ), सत्यजीत पानसरे ( डाळज नंबर २ ) , चिरंजीव तेजस सानप ( लाखेवाडी ), दीपक पंढरीनाथ खाडे ( निंबोडी ) अध्यक्ष जय भगवान मा संघ, गणेश डोईफोडे (डाळज नंबर २ ), तुकाराम पानसरे ( लाखेवाडी ),
चिरंजीव महेश उगलमुगले ( लाखेवाडी ), सचिन केकान ( घोलपवाडी ), विशाल दराडे महाराज ( चिखली ), आतिश गावडे ( डाळज नंबर २ ) ,
राजाभाऊ डोईफोडे ( डाळज नंबर २ ), पप्पू शेठ जगताप ( डाळज नंबर २) , विशाल सोने ( डाळज नंबर २ ), नितीन वनवे ( डाळज नंबर २ ), विपुल रुपनवर ( डाळज नंबर २ ),
संतोष पानसरे ( कुंभारगाव ), शेखर संतोष पानसरे ( ग्रामपंचायत सदस्य निमसाखर ) पानसरे मळा इत्यादी तरुणांनी फुल नाही तर फुलाची पाकळी या तत्वावर ही रक्कम एकत्र करून निमसाखर गावचे ग्रामपंचायत सदस्य पैलवान शंकर पानसरे यांनी स्वतः निंबोडी येथे घोळवे कुटुंबास सदर रक्कम सुपूर्त केली.
यावेळी निंबोडी गावातील ह. भ. प .शरद घोळवे, निंबोडी गावचे माजी सरपंच संतोष घोळवे, निंबोडी गावचे पोलीस पाटील मनोज होडशिळ, ह .भ .प. बंडू घोळवे ( गुरुजी ), जय भगवान महासंघाचे अध्यक्ष दीपक खाडे, धनाजी घोळवे, राहुल नाकाडे व समाज बांधव उपस्थित होते.

