shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लहानपणी लाड आणि मोठेपणी हाल..!



हा विश्वाचा खेळ आहे. यातून आपण काही बोध घेणार आहोत का ? 
बोध हा शब्द कशासाठी वापरला जातो ? 
कालच दसरा झाला. आपण साजरा केला. अजुन किती दिवस साजरा करणार आहोत.
दसरा असो, क्रिसमस अथवा ईद! साजरा करणारी माणसेच आहेत आणि त्यांना पोसणारा निसर्गच आहे.

 जगभरातले शास्त्रज्ञ ओरडून सांगत आहेत ही पर्यावरणाचे रक्षण केले नाही ही तर अवघ्या दोन-चार वर्षात सणवार साजरे करायला आपण राहणार नाही. अशी अवस्था निसर्ग आणून ठेवेल. आता निसर्गाला सांभाळायचे,त्याचे रक्षण करायचे म्हणजे काय?  
हे काम पैशाने होणार आहे काय? पैसे दिले की सर्वकाही मिळते हा भ्रम डोक्यातून काढून टाका. स्वतः निसर्ग जगायला शिका. तरच खऱ्याअर्थाने पर्यावरण रक्षण होऊ शकेल. 
नर्सरीत जाऊन झाडे आणायची, घरात, सोसायटीत, कुंडीत लावायची. किती दिवस जगतात ही झाडे नि वेली? दरवर्षी आपण स्वतःलाच किती फसवायचे? 
जगातील शास्त्रज्ञांनी २०१८ पासूनच पर्यावरणीय आणीबाणी जाहीर केलेली आहे. यातून बोध घेऊ या. स्वतः बी खरेदी करून झाड लावूया आणि त्याचे संगोपन करूया. यामुळे जो आनंद मिळेल त्यामुळे बालपणी लाड आणि मोठेपणी हाल ही अवस्था येणार नाही. समाजकल्याण हा विषय जगायला शिका. पैसे देऊन, देणग्या देऊन कोणावर भरोसा टाकून आपण पर्यावरण साक्षरता रुजवू शकत नाही. ती आपल्याला दैनंदिन जीवनात जगायला शिकायला हवे. आपल्या परिवाराला शिकवायला हवे.

 भविष्यात प्रत्येकजण वाढत्या वयाबरोबर या सृष्टीचा निरोप घेऊन जाणारच आहे. पण ज्या सृष्टीच्या अंगाखांद्यावर खेळलो तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्या सृष्टीला समृद्ध वनराई देण्यासाठी घराघरातून प्रयत्न करणे हे पर्यावरणीय रक्षणाचे उत्तर आहे. आपण एक दिवस जग सोडून जाणार हे शाश्वत सत्य आहे पण आपण लावलेली झाडे आपल्या साधुसंतांचा संदेश देत उभी असतील आणि ही झाडेच विश्वाचा विनाश वाचवतील. 
दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटी, वाढते तापमान, ज्वालामुखीचा उद्रेक, वादळे, भूकंप अशा आपत्तीमध्ये मानवाचे किती हाल होत आहेत? त्यात ज्येष्ठ नागरिकांना अजूनही हाल सहन करावे लागतात. भविष्यात हे सर्व आपल्याला टाळायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने जमेल तिथे, अगदी आपल्या घराच्या बाल्कनीपासून, खिडकीत, मोकळ्या जागेपासून सुरुवात करा आणि तिथे बी पेरा. आज परिस्थिती अशी आहे की, प्रचार माध्यमांवर वृक्ष लागवड, संवर्धन आणि पर्यावरण रक्षण याबाबत आपल्याला खूप माहिती उपलब्ध आहे. ती स्वतः अवलोकन करा. विचारत बसू नका आणि एकेक बी लावून त्याचे झालेले रोपटे वाढत असताना अवलोकन करणे हे किती आनंदाचे आहे ते जगायला शिका. हाच करा दसरा! साधु संत येती घरा तोचि दिवाळी दसरा! हे वचन ध्यानात ठेवा. 
घरामध्ये अथवा आपल्या जगण्यामध्ये जेवढ्या अत्याधुनिक सुविधा आपण वाढवणार आहोत तेवढा पर्यावरणाचा नाश आपण करणार आहोत हे सूत्र विसरू नका. 
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरता अभियानात सहभागी व्हा. 

लेखक : चंद्रकांत शहासने, निसर्गोपचारक. 
मोबाईल क्रमांक ९८८१३७३५८५

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरता मोहिमेअंतर्गत प्रसारीत.
close