-------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथे दोन गटात हाणामाऱ्या झाल्या असून एकमेकां विरुद्ध दिलेल्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, बोरगाव (बु.) येथील संतोष तुकाराम गव्हाणे यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, दि. १५ ऑक्टोबर रोजी शुक्रवार रोजी सकाळी ८:३० वा. च्या दरम्यान बळीराम गव्हाणे व संतोष उर्फ अण्णा बळीराम गव्हाणे यांनी संतोष गव्हाणे याच्या घरा समोर अंगणात उभी केलेली बैलगाडी काढून घ्या. असे म्हणताच बळीराम गव्हाणे व संतोष उर्फ अण्णा बळीराम गव्हाणे यांनी संगणमत करुन संतोष गव्हाणे यास शिवीगाळ करुन लाथा-बुक्यांनी व दगडाने मारहाण केली. बाळासाहेब गव्हाणे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना पण दगड फेकून मारला. यात बाळासाहेब याला ओठाला दगड लागुन दुखापत झाली. तसेच विलास याचे उजवे पायाचे हाड फ्रॅक्चर होवुन गंभीर दुखापत झाली आहे. तसेच तुम्ही बैलगाडी कशी लावु देत नाहीत. असे म्हणुन धमक्या दिल्या.
या प्रकरणी संतोष तुकाराम गव्हाणे यांच्या तक्रारावरून बळीराम गव्हाणे व संतोष उर्फ अण्णा बळीराम गव्हाणे यांच्या विरुद्ध गु.र.नं. ५०२/२०२१ भा.दं.वि. ३२६, ३२४, ३३६, ५०४, ५०६ ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तर बळीराम शंकर गव्हाणे याने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. १५ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी ७:३० वा बंडु तुकाराम गव्हाणे याने त्याच्या घरा समोर त्याचा मुलगा संतोष गव्हाणे यास किरकोळ कारणावरून चापट मारली. म्हणून बळीराम गव्हाणे व संतोष गव्हाणे यांनी त्याचा जाब विचारला असता; यातील फिर्यादी व साक्षीदार यांनी चापट का मारलीस? असे विचारले असता शिवीगाळ करून बंडु तुकाराम गव्हाणे व आशीतोष तुकाराम गव्हाणे यांनी फिर्यादी बळीराम गव्हाणे याच्या डोकीत लाकडी बॅटने मारून जखमी केले. त्याचा मुलगा संतोष गव्हाणे हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता बाळु तुकाराम गव्हाणे व बाबु शहाजी गव्हाणे यांनी लाथा बुक्क्याने मारहान करून मुका मार दिला. तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
बळीराम गव्हाणे यांच्या तक्रारी वरून बंडु तुकाराम गव्हाणे, आशीतोष तुकाराम गव्हाणे, बाळु तुकाराम गव्हाणे व बाबु शहाजी गव्हाणे या चौघा विरुद्ध गु.र.नं. ५०५/२०२१ भा.दं.वि. ३२४, ३२३, ५०४ ५०६ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे अशोक गवळी व अमोल गायकवाड हे तपास करीत आहेत.

