shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अतुल झगडे यांना कोरोना “योद्धा” पुरस्काराने एकल प्राथमिक शिक्षक सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा पुणे जिल्हा यांच्या वतीने सन्मानित.

अतुल झगडे यांना कोरोना “योद्धा” पुरस्काराने एकल प्राथमिक शिक्षक सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा पुणे जिल्हा यांच्या वतीने सन्मानित.

इंदापूर प्रतिनिधी:  एकल प्राथमिक शिक्षक सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा पुणे जिल्हा यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा कोरोना योध्दा पुरस्कार इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा विद्युत वितरण समितीचे तालुकाध्यक्ष झगडेवाडी गावचे सुपुत्र अतुल झगडे यांना देण्यात आला.


२ ऑक्टोबर रोजी हडपसर येथील एस एम जोशी कॉलेज सभाग्रह सानेगुरुजी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्या वेळी भव्य रक्तदान शिबिर व कोविड योध्दा पुरस्कार वितरण सोहळा सौ सुनंदाताई राजेंद्र पवार व सौ कुंतीवहीनी रोहित पवार यांच्या शुभहस्ते पुरस्कारार्थी चा सन्मान करत सोहळा संपन्न झाला.


 
यावेळी आमदार चेतन तुपे,आ अरुण लाड, निर्मला पानसरे, रंजीत शिवतारे, वैशाली बनकर, रमेश थोरात, आयुष प्रसाद आदि उपस्थित होते.

या वेळी अतुल झगडे यांनी कोरोना काळामध्ये राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन समाजऋण फेडण्यासाठी जे कार्य केले तसेच सामाजिक बांधिलकीची जाण व भान ठेवून समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी महान कार्य करीत आहात त्या बद्दल आपली पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.


 
अतुल झगडे हे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष असून ते विद्युत वितरण समितीचे तालुका अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी झगडेवाडी गावात विविध उपक्रम राबवून गावातील गुणवंतांचा गौरव केला आहे.
close