shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका हा गांधी विचाराचा- स्वप्नील सावंत.लोकाभिमुख निर्णयाचे शेतकरी वर्गातून कौतुक.

इंदापूर तालुका हा गांधी विचाराचा- स्वप्नील सावंत.

लोकाभिमुख निर्णयाचे शेतकरी वर्गातून कौतुक.
 
   इंदापूर प्रतिनिधी:    इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती इंदापुरात साजरी करण्यात आली.
      यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम महसूल मंत्री मा.बाळासाहेब थोरात साहेब यांचे संकल्पनेतुन महसूल विभाग लोकाभिमुख व्हावा यासाठी  महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी जी यांचे जयंतीचे औचित्यानिमित्त शेतकरी वर्गाला मोफत घरपोच 7/12 सह शासकीय योजनांचा लाभ विनामुल्य देण्याची मोहीम राज्यभर आज पासून सुरू केलेली आहे . 
          तसेच रेशन कार्ड वरील नावे कमी करणे व नवीन नावे समाविष्ट करण्याचाही उपक्रम ह्यात समाविष्ट आहे . ह्या योजनेचा शेतकऱ्याने लाभ घ्यावा असे मत तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी मांडले . 
     इंदापूर तालुका हा गांधी विचाराचा आहे आणि येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतून ते दिसून येइल असे ही ते म्हणाले .
 या वेळी काकासाहेब देवकर, आबासाहेब निंबाळकर, चमनभाई बागवान, जकीरभाई काझी, डॉ संतोष होगले, भगवान पासगे, निवास शेळके, महादेव लोंढे, राहुल वीर, आकाश पवार, राहुल जाधव ,विपुल भिलारे,तुषार चिंचकर ,श्रीनिवास पाटील, चेतन कोरटकर, मिलिंद साबळे, सुफियान जमादार, संदीप शिंदे, युवराज गायकवाड आदी उपस्तिथ होते .
close