shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाणी चोरणार्‍याकडून उपोषणाची नौटंकी,मिरी-तिसगाव योजनेवरून कर्डिलेंवर राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी साधला निशाणा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.

 मंगळवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१.
अहमदगर: थकीत वीज बिलामुळे बंद असणारी मिरी-तिसगाव पाणी योजनेच्या तीन वेळा बैठक घेवून सुरू केली. योजना सुरू करण्यासाठी बोलविलेल्या बैठकीला योजनेतील बुर्‍हाणनगर आणि नागरदेवळे गावचे सरंपचांना बोलावले. पण ते आले नाही. तर दुसरीडे या पाणी योजनेतून पाणी चोरणारेच योजना बंद पडल्यावर उपोषणाची नौटंकी करत असल्याची टीका ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता केली.

मंत्री तनपुरे म्हणाले, भाजपच्या उपोषणात माजी आ. कर्डिले यांनी बंद असणार्‍या मिरी-तिसगाव योजनेचा उल्लेख केला होता. याबाबत माहिती देतांना मंत्री तनपुरे म्हणाले, ही योजना माझ्या मतदारसंघात असून या योजनेतील बुर्‍हाणनगर हे कर्डिले यांचे गाव आहे. याच गावातील अमोल जाधव यांनी मिरी-तिसगाव योजनेतून पाणी चोरी करून ते शेतात वापरण्यात येत असल्याची तक्रार केली होती. चौकशीत त्यात तथ्यही आढळले होते.    तर दुसरीकडे वीज वितरणची थकबाकी वाढल्याने तीन वेळा या योजनेची वीज जोडणी तोडण्यात आली. यावर मार्ग काढण्यासाठी तीन वेळा योजनेतील गावच्या सरपंचांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला कर्डिले समर्थक बुर्‍हाणनगर आणि नागरदेवळेचे सरपंच आले नाहीत. बैठकीला यायचे नाही अन् वसूली द्यायची नाही. यामुळे योजनेतील प्रत्येक गावाला देण्यात येणारे पाणी मीटर बसवून देण्याच्या सुचना नगर पंचायत समितीला करण्यात आलेल्या आहेत. मात्र, यातील बुर्‍हाणनगर आणि नागरदेवळे गावाने अद्याप मीटर बसलेले नसून येत्या 15 दिवसात मीटर न बसवणार्‍या गावाचे पाणी बंद करण्यात येणार असल्याचा इशारा मंत्री तनपुरे यांनी दिला आहे.
            नगर तालुक्यात अनेक वर्षे वीज वितरणाचे पायाभूत प्रश्न रखडले गेल्याने अडचणी आहेत. मात्र, आता मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण माहिती घेऊन सबस्टेशन, फिडर, ट्रान्सफॉर्मर या सर्व पातळ्यांवर कामांचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नगर तालुक्यातील सर्व विजेचे प्रश्न सोडवून शेतकर्‍यांना मदत केली जाईल अशी ग्वाही तनपुरे यांनी यावेळी दिली.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close