शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी: महावितरण कंपनीची विद्युत सहाय्यक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे करण्यात येणार येणार आहे. ज्या उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल त्यांना नियमानुसार अपात्र घोषित करण्यात येईल, कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही असा प्रकारे संपुर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल असे मत उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.
"विद्युत सहाय्यक पदाची यादी 2-3 दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. काही विद्यार्थ्यांचा यादीतील काही मुद्द्यांवर आक्षेप होता. काही बाबतीत संभ्रमाचे वातावरण होते. काल मुलांच्या काही प्रतिनिधींबरोबर चर्चा करून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले.
यादी जाहीर झाली म्हणजे अंतिम नियुक्ती दिली, असे नाही. जाहिरात देताना ज्या गोष्टींचे निकष लावले आहे, त्या सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन केले जाईल. मग ते बेस्ट ऑफ फाइव्ह असो, शैक्षणिक पात्रतेचे निकष असो, किंवा अन्य काही निकष असो. नियुक्ती देण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
कागदपत्रे पडताळणी करताना जाहिरातीतील निकषांची पुर्तता न करणारे अर्ज प्रक्रियेतून बाद केले जातील. त्यामुळे कोणावरही किंचित देखिल अन्याय होणार नाही. कृपया शंका घेऊ नका. अत्यंत पारदर्शकपणे प्रक्रिया राबवण्यात येईल. तुमचा हा भाऊ शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी उभा आहे."
एच एस बी सी, फोर्ट येथील महावितरण सूत्रधार कंपनीच्या इमारतीमध्ये राज्यातील निवडक विद्युत सहायक उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सोमवारी (ता.०४) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्त्तरे देवून ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारांचे समाधान केले. त्यानंतर उमेदवारांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पुष्पगुच्छ देवून आभार मानले.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल पारदर्शकपणे जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबाबत माध्यमांतून आणि समाजमाध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होते. याकरिता राज्यातील विविध भागातून विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज केलेले आणि या निकालावर शंका असलेल्या उमेदवारांना बोलावून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. निकालात कसल्याही प्रकारची चुक झाली नसल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600.

