shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

. कै.संपतराव बुवासो निंबाळकर क्रीडा प्रतिष्ठान सणसर यांचे वतीने ५५ कीलो खालील राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा संपन्न. ४५ कबड्डी संघांनी नोंदवला सहभाग

कै.संपतराव बुवासो निंबाळकर क्रीडा प्रतिष्ठान सणसर यांचे वतीने ५५ कीलो खालील  राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा संपन्न.
  
४५  कबड्डी संघांनी  नोंदवला सहभाग.
इंदापूर प्रतिनिधी: भवानीनगर येथे ५५ किलो  पुरुष गट राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन भवानीनगर येथील छत्रपती हायस्कूल येथे  कै.संपतराव बुवासो निंबाळकर क्रीडा प्रतिष्ठान सणसर यांचे वतीने आयोजन (दि.३ ऑक्टो.) रोजी करण्यात आलेल्या कबड्डी  स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या.
 या स्पर्धेचे  उदघाटन प्राचार्य मचाले , उप मुख्यद्यापक भालचंद्र निंबाळकर , युवा सेना प्रमुख पिंटु गुप्ते, ढेकळवाडीचे मा. सरपंच नाना घुले ,राजाभाऊ जाधव राष्र्टीय खेळाडु अक्षय ठोंबरे, रणजीत भोसले, सुमेध निंबाळकर, मालोजीराजे निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले.
 स्पर्धेत पुणे, नगर ,कोल्हापुर बार्शी, सासवड यासह ४५ संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 

 स्पर्धेत मध्ये राजाभाऊ जाधव अध्यक्ष बिल्डर ग्रुप भवानीनगर व अशोक भोईटे कोच भवानीनगर संघ  यांच्या वतीने देण्यात आलेले प्रथम क्रमांकाचे बक्षीस आशीर्वाद मच्छी ढाबा बारामती या संघाने पटकावला,  भालचंद्र निंबाळकर मुख्याध्यापक मानकरवाडी यांच्या वतीने देण्यात आलेला द्वितीय क्रमांक नवतरुण क्रीडा मंडळ सासवड यांनी पटकावला तर लखन भोईटे जय हनुमान फूटवेअर भवानीनगर यांच्या वतीने देण्यात आलेली तृतीय बक्षीस जय हनुमान क्रीडा मंडळ २४ फाटा सोमंथळी यांनी पटकावला.
या कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ जाधव, भालचंद्र निंबाळकर यांनी केले. तर  राहुल देवकर, सागर देवकर, नवनाथ भिसे, अमोल गर्जे, महेश पिसे ,कुणाल शिंदे, किरण आडसूळ, श्याम गायकवाड, अभिषेक जाधव ,गणेश कर्चे, पवन खाडे, भैया करे, अमर पांढरे, शुभम करे, ओमकार खराडे, बाळा गलांडे, संकेत सर्जे हे संयोजक होते.
close