शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी: येथे दोन सख्ख्या भावाचा मुळा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमर पगारे ( वय १४ ) व सुमित पगारे (वय १२) असे मृत दोघा भावंडाची नावे आहे. ही घटना काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधीक माहिती अशी की, राहुरी येथील मुळा नदीवरील पुलाजवळील गणपती घाटानजिक पाच जण पोहायला गेले होते. यापैकी अमर पगारे व सुमित पगारे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक तरूणांनी तीन जणांना वाचविले. मात्र दोघेजण पाण्यात वाहून गेले.
सदर घटनेची माहिती समजताच राहुरी नगरपालिकेचे पथक तातडीने अग्नीशामकसह दाखल झाले. बुडालेल्या दोन मुलांचा शोध सुरू आहे. नदीपात्रात सध्या मुळा धरणातून ८ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. त्यातच वाळू उपशामुळे नदीपात्रात सुमारे दहा फुटाहून अधिक खोलीचे डोह तयार झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600.

