shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लखीमपूर घटनेचा केज काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध..!!


(शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या आरोपींना कडक शासन करा)
------–--–-----–-------

प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी: उत्तर प्रदेशातील लखिमपुर मध्ये आंदोलन करनाऱ्या शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडून मारण्यात आले व या घटनेनंतर न्याय मिळावा म्हणून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना देखील धक्का बुक्की करण्याचा गलिच्छ प्रकार झाल्याने या दोन्ही घटनेचा जाहीर निषेध केज तालुका काँग्रेसच्या वतीने नोंदवण्यात आला असून याबाबतचे निवेदन केज तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
        


लखीमपूर (उत्तर प्रदेश) येथे अमानवी पद्धतीने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार करण्यात आले असून शेती प्रधान देशात शेतकरी असुरक्षित असून सतत शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असून उत्तर प्रदेश सरकारने यामध्ये योग्य पद्धतीने चौकशी करावी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली असून यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी ह्या पीडित कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांनाही उत्तर प्रदेश सरकार पोलिसांनी धक्का बुक्की करून त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आले असून हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न असून अशा प्रवृत्ती चा केज तालुका काँग्रेस कमिटी, केज तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करत निवेदन देण्यात आले आहे.
         

यावेळी केज तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, पशुपतीनाथ दांगट, प्रविणकुमार शेप, दलिल इनामदार, कबिरोद्दीन इनामदार, अमर पाटील, कपिल मस्के, अमोल डोईफोडे, विनोद शिंदे, अरुण गुंड, समीर देशपांडे, दिनकर राऊत, ताहेर कुरेशी, रंजित खोडसे, शेखर सिरसट, अक्षय गित्ते यांच्यासह सर्व तालुका व शहर काँग्रेस तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close