राहुरी । प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना डि लिंट ही पदवी देऊन गौरवण्यात आलें आहे. गोवा येथे झालेल्या एका शानदार संमारभात जाधव यांना डि लिट दिली गेली त्यांनी आज पोहत सामाजिक शैक्षणीक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामांची दखल घेत रामचंद्र जाधव यांना कॅलिफोर्निया युनव्हर्सिटी ऑफ अमेरिका याच्या वतीने डाॅक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.
रामचंद्र जाधव हे नगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरा नगर येथील विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले नंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षण अधिकारी झाले अहमदनगर येथे शिक्षण अधिकारी असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेला सारखाच रंग देऊन शाळेच्या भिंती बोलक्या केल्या तर शिक्षण उपसंचालक म्हणून देखील रामचंद्र जाधव यानी भरीव कामं केले.
गोवा येथील पदवी बहाल समारंभाला गव्र्हमेन्ट ऑफ इंडिया सचिव डाॅ सहदेव सिंह ,अशोक रणखांब,लेखिका डाॅ पंकजा इंगळे,डाॅ रत्नाकर आहिरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
रामचंद जाधव यांना डि लिंट पदवी मिळाल्या बद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

