शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी: दिनांक ०६ ऑक्टोबर–
महात्मा फुले कृषी विद्यापीठात अनेक सामाजिक कार्यकर्ते माहीती आधिकारात विद्यापीठाच्या विविध योजनासंदर्भात विविध विभागाकडे माहीती मागवत असतात. ही माहीती वेळवर पुरवली जात नाही किंवा माहीतीच दिली जात नाही. तर काहीवेळा दिशाहीन माहीती पुरविली जाते. याबाबत राज्य माहिती आयोगाने येथील माहिती अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देत दणका दिला आहे
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे कि, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोमा जाधव यांनी दि ४ डिसेंबर २०१८ रोजी माहीती आधिकारात अर्ज करून राहुरी विद्यापीठाचे तात्कालीन कुलगुरू डॉ के. पी विश्वनाथा हे रूजु झाले पासुन त्यांनी स्वतः करीता जी वाहने वापरली त्याचे नंबर व वाहनांचे लॉगबुक इत्यादी बाबतीत माहीती मागवली होती. सदर माहीती मिळाली नाही म्हणुन जाधव यांनी प्रथम अपीलीय अधिकारी तथा उपकुलसचिव प्रशासन म.फु कृ. विद्यापीठ राहुरी यांचेकडे दि १० जानेवारी २०२१ रोजी द्वितीय अपील सादर केले.
सदरचे अपिलाची सुनावणी होऊन अर्जदारास तात्काळ माहीती पुरविण्याचे आदेश या निकालात देण्यात आले. मात्र तत्कालीन जन माहीती आधिकारी तथा सहा. कुलसचिव प्रशासन आणि मानिव जन माहीती आधिकारी तथा कुलगुरू यांचे स्विय साहाय्यक यांनी ही माहीती देण्यास टाळाटाळ केली. म्हणुन जाधव यांनी दि ३ एप्रिल २०१९ रोजी राज्य माहीती आयोग खंडपीठ नाशीक यांचे कडे द्वितीय अपील दाखल केले होते. सदर अपिलाची अपिल नं १०३२ / २०१९ नोंद होऊन नमुद सुनावणी दि ३० ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाईन झाली. त्यात निकाल देण्यात आला.
या निकालात आयोगाने म्हटले आहे की माहीती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ५ (४) व ५ (५) अन्वये वाजवी सहकार्य करण्याची जबाबदारी मानिव जन माहीती आधिकारी तथा कुलगुरु यांचे स्विय सहाय्यक यांची होती. तसेच सहाय्यक जन माहीती आधिकारी यांनी माहीती देण्यासाठी मदत करणे गरजेचे असुनही त्यांनी मदत केली नाही. आयोगाने निकालात आदेश पारित केला असुन अर्जदार अपीलार्थीस त्यांनी दि ४ डिसेंबर २०१८ चे अर्जात मागणी केले प्रमाणे १५ दिवसात माहीती देण्यात यावी. तात्कालीन जन माहीती आधिकारी तथा सहा कुलसचीव प्रशासन श्री सा. सु. पेंडभाजे व मानिव जन माहिती अधिकारी तथा कुलगुरू यांचे स्विय साहाय्यक श्री रं. पा .चोथे यांना माहीती आधिकार २००५चे कलम २० ( १ ) अन्वये शास्ती व दंडाची कारवाई का करण्यात येऊ नये अशा नोटीसा देऊन १५ दिवसाचे आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600.

