shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूजा पानसरे यांचा वंजारी समाज समन्वय समिती व दैवत फाउंडेशनच्या वतीने सत्कार.

पूजा  पानसरे यांचा वंजारी समाज समन्वय समिती व दैवत फाउंडेशनच्या वतीने सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी: (१ ऑक्टोबर २०२१)सहाय्यक वनसंरक्षण वर्ग-१ पदी महाराष्ट्रात महिलांमध्ये प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल पूजा भाऊसाहेब पानसरे यांचा डाळज नं.२ या ठिकाणी  सन्मानपूर्वक समस्त वंजारी समाज समन्वय समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
श्रीमती पूजा भाऊसाहेब पानसरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महसूल व वन विभागातील सहाय्यक वनसंरक्षण गट तसेच वनक्षेत्रपाल गट ब या संवर्गातील एकूण शंभर पदावरील भरती  करिता दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल २९ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील श्रीमती पूजा भाऊसाहेब पानसरे यांची महिला मधून प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली.
त्यांनी मिळवलेल्या उत्तम यशाबद्दल वंजारी समाज समन्वय समिती व दैवत फाउंडेशनच्या   वतीने त्यांचा डाळज नंबर २ येथे जाहीर सत्कार करण्यात आला.

 यावेळी उपस्थित डाळज नं.२ चे समाज बांधव तसेच  रुपेश गमरे , दिपक खाडे, प्रदिप सोनने,  अभिजित पानसरे ,माऊली सोनने,  सत्यजित पानसरे आणि वंजारी सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष, व ग्रामपंचायत  निमसाखर सदस्य पै शेखर  पानसरे युवा समाजसेवक डाळज नं.२ दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका अध्यक्ष भैय्यासाहेब पानसरे उपस्थित होते. अशी माहिती हिरालाल पानसरे यांनी दिली.
close