shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात तक्रार निवारण दिन आयोजित केला जाणार- गटविकासअधिकारी विजयकुमार परीट. इंदापूर पंचायत समितीत तक्रार निवारण दिन संपन्न.



 प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात तक्रार निवारण दिन आयोजित केला जाणार- गटविकासअधिकारी विजयकुमार परीट.
 
इंदापूर पंचायत समितीत तक्रार निवारण दिन संपन्न.

इंदापूर प्रतिनिधी:(१ ऑक्टोबर २०२१) इंदापूर तालुक्यातील पंचायत समिती येथे सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मुंबई दि.०३ मार्च २०२२० शासन निर्णय असून मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र कोरोनाची परिस्थिती सुरळीत होताच  शुक्रवार दि.०१ आँक्टोंबर २०२१ रोजी महिन्यातील पहिला शुक्रवारी इंदापूर पंचायत समिती सभागृहात तक्रार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात तक्रार निवारण दिन आयोजित केला जाणार आहे.त्यामुळे ज्या नागरिकांच्या काही समस्या असतील त्यांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात पुराव्यासह इंदापूर पंचायत समिती कार्यालयाकडे द्याव्यात आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी तक्रार निवारण दिनी स्वतः उपस्थित राहून आपल्या प्रश्नाचे निसरन करून घ्यावे असे आवाहन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले आहे.

नागरिकांच्या तक्रारी,अडचणींची सोडवणूक करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती.सदर सभेबाबत लेखी तक्रार दिलेल्या सर्व तक्रारदारांना सभेपूर्वी ८ दिवस अगोदर अवगत करण्यात आले होते अशी माहिती इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.

एकूण इंदापूर पंचायत समिती कार्यालयाकडे १० व्यक्तींच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ०९ तक्रारदार आजच्या सभेस उपस्थित होते. त्यांचे म्हणने ऐकूण घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे असे विजयकुमार परीट यांनी स्पष्ट केले आहे.सदर दिवशी ०८ माहिती अधिकार अपील ठेवण्यात आली होती.त्यापैकी उपस्थित असणाऱ्या सात अपील कर्त्यांची सर्व अपीले निकाली काढण्यात आली.

सदर सभेसाठी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सह.गटविकास अधिकारी रामचंद्र शिंदे,बांधकाम अपअभियंता एस.एस.कुपल, सर्व संबंधित विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
close