shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर- संगमनेर मध्ये परतीच्या पावसाने तालुक्यातीलहजारो हेक्टर ऊस भुईसपाट..! बळीराज्याच्या चिंतेत वाढ..!!



संगमनेर । प्रतिनिधी: परतीच्या पावसाच्या फटक्याने संगमनेर तालुक्यातील हजारो हेक्टर शेती भुईसपाट झाली आहे. यावर्षी संगमनेर तालुक्यात ओल्या दुष्काळाने खूप मोठं नुकसान केलं आहे. परतीचा पाऊस काय जायलाच तयार नाही, तर संगमनेर ऊस उत्पादकांचे या पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी वर्गाचे म्हणणं आहे की मदत करायची तेव्हा करा पण  सध्या आमच्या नुकसानभरपाईचे पंचनामे करा अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.

बळीराजा आपले दुःख व्यक्त करीत आहे, एवढे मोठे नुकसान झाले तरी शासनाकडून अजूनही पंचनाम्याला कोणी आले नाही, आम्ही कर्ज काढून एवढा मोठा खर्च करतो की आम्हांला पुढे काहीतरी भेटेल पण आत्ता काय भेटणार .. यासाठी लवकरात लवकर पंचनामे करून मायबाप सरकारने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची शासनाकडे आर्त विनंती केली.
close