शुक्रवार,२९ ऑक्टोबर , २०२१
पुणे : पत्नीसोबत माझा घटस्फोट झाला आहे असे खोटे सांगत पुण्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने महिला पोलीस उपनिरीक्षकावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 33 वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार खडकी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी महिला पोलीस उपनिरीक्षक या पुण्यातच कार्यरत आहेत. 2013 पासून वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हरीश सुभाष ठाकूर (वय 40 वर्ष) असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. हरीष हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. अशी खोटी माहिती देऊन फिर्यादी सोबत विवाह केला. त्यानंतर फिर्यादीचा सतत शारीरिक व मानसिक छळ करून विवाहबाह्य संबंध ठेवले. एवढ्यावर आरोपी थांबला नाही तर त्याने पीडित महिलेच्या 5 वर्षीय मुलासमोर तिच्यासोबत वारंवार अनैसर्गिक संबंध ठेवले. 2015 साली तर आरोपीने हद्दच पार केली. फिर्यादी महिला पोलीस उपनिरीक्षक नवी मुंबई येथील घरी असताना तिला ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्यावर गोळी झाडली. ही गोळी फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटाला लागली असून त्यात फिर्यादी जखमी झाल्या. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान इतके दिवस आरोपीच्या दबावामुळे फिर्यादीने महिलेने तक्रार दिली नव्हती. मात्र आरोपीने लग्नाची नोंदणी करण्यास टाळाटाळ केली विश्वासघात केल्याने फिर्यादीने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

