shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महावितरणविरुद्ध संतोष मोकळ यांचे उपोषण आज दुसऱ्या दिवशी सुटले...! पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या उपोषणाला यश..!



श्रीरामपूर । प्रतिनिधी - कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण जग भरडले जात असताना श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरणकडून विज बीले न भरणाऱ्या विज ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करण्याचा मोठा कहरच माजविला असून, ऐन सनासुदीच्या काळात विज कनेक्शन कट करण्याचा धडाका लावल्याने आधीच कोरोना संकटाने भरडला जात असलेला सर्वसामान्य नागरिक मोठ्या त्रासाचा सामना करत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाकाळात सर्वसामान्य जनतेच्या हाताला कामधंदा नसताना त्यावर आर्थिकदृष्ट्या हतबल झालेला असताना अशा परिस्थितीत महावितरणच्याअधिकारी,कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन काळात विज मिटरचे रिडिंग न घेता अवास्तव विज बीले पाठवून ज्यांनी सदरील विज बीले भरली नाहीत त्यांची मोठ्या फौजफाट्यासह येऊन वीज कनेक्शन कट करणे, त्यांना धमकावणे तथा कोणतीही पुर्वसुचना न देता त्यांची वीज कनेक्शन कट करणे असा अंदांधूत कारभाराचा धडाकाच लावला आहे.

याबाबत असंख्य वीज ग्राहकांनी महावितरणकडे वेळोवळी तक्रार करुनही त्याची कोणतीच दखल घेतली जात नसल्याचे निदर्शनास आल्याने पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर तालुकाध्यक्ष संतोष मोकळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपोषण छेडले होते,त्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता.मात्र या उपोषणाची तात्काळ दखल घेत महावितरणचे कार्यकारी अभियंता अजय भंगाळे,उप कार्यकारी अभियंता दिनेश चावडा, डेप्युटी मॅनेजर प्रविण गायकवाड यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजून घेत महावितरणच्या संबंधित अधिकारी,कर्मचाऱ्यांना समज देण्याचे उचित आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने कार्यकारी अभियंता श्री.भंगाळे यांच्याहस्ते उसाचा रस घेत संतोष मोकळ यांनी दुसऱ्या दिवशी आपले उपोषण सोडले.यावेळी समता फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,इंजि.मोहसिन शेख,पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवा तालुकाध्यक्ष भगवान रोकडे, तालुका उपाध्यक्ष संजय त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपोषणास समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख, इंजि.मोहसिन शेख,अ.भा. लहुजी सेनेचे बाळासाहेब बागुल, हानिफभाई पठाण, समाजवादी पार्टीचे जोयफभाई जमादार, आझाद हिंद कल्बचे बाळासाहेब शेरकर राष्ट्रवादीचे लकी सेठी , रिपब्लिकन पक्षाचे रितेश ऐडके,पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीचे सुनिल महांकळे,बसपाचे राजु खरात,कैलास ठोंबरे, श्रीरामपूर रिक्षा युनियनचे सलिम पिंजारी, गुलाब राजपूत, श्रीरामपूर बुद्धीबळ संघटनेचे राजेंद्र बोरुडे, बहुजन टायगर फोर्सचे संजय रुपटक्के, बाळासाहेब हिवराळे, सतीष मगर, भिमशक्ती सामाजिक संघटनेचे अमोल काळे,पत्रकार कृष्णा कदम, सुनिल लोखंडे,सलिम बाबुखान पठाण, मुरली किंगर, राजेंद्र जोशी,सुभाष गिरमे,आदींनी उपोषणास पाठिंबा दर्शविला होता.

उपोषण यशस्वी करण्यासाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका उपाध्यक्ष संजय त्रिभुवन, शहराध्यक्ष रमजान शेख, युवक तालुकाध्यक्ष भगवान रोकडे, तालुका सरचिटणीस मायकल मुन्तोडे आदी प्रयत्नशिल होते.
close