श्रीरामपूर । प्रतिनिधी:-
येथील आर.बी.एन.बी.(लक्ष्मी टॉकीज रोड ) रस्त्यालगत असलेले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता देखभाल तसेच दुरुस्ती डागडुजी सुशोभिकरण करण्यात यावे,तथा या दोन्ही पुतळ्यांच्यामधील मोकळ्या असलेल्या जागेमध्ये क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा बसविण्यात यावा.
तसेच वॉर्ड क्र.१ येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन मंगल कार्यालयाची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात यावे, जेणेकरून सर्वसामान्य गरीब कुटुंबातील नागरिकांना विवाहप्रित्यर्थ तसेच इतर कार्यक्रमांसाठी सदर सांस्कृतिक भवन या कार्यालयाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल मात्र सदरील मागण्या या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी मेनरोडवरील राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भारतीय लहुजी सेनेच्यावतीने अमरण उपोषण करण्यात येईल या मागणीबाबतचे निवेदन भारतीय लहुजी सेनेच्यावतीने नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व मुख्याधिकारी श्रीरामपूर नगरपरिषद श्रीरामपूर यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल ,राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण,राज्य संपर्कप्रमुख शेख अहमद नसिर ,जिल्हा संघटक राजेंद्र वामनराव त्रिभुवन, जिल्हाध्यक्ष रज्जाक शेख, रईस शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

