प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २९/ करमाळा तालुक्यातील निमगाव हवेली येथील मागास वर्गीय शेतकऱ्यांचे उपोषण समीर माने तहसीलदार करमाळा यांचे लेखी ठोस आश्वासना नंतर माघे घेण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, आरपीआयचे प. म. उपाध्यक्ष नागेश दादा कांबळे, लहुजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष नामदेव गायकवाड, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते संजय शिंदे, सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, माजी उपसरपंच विठ्ठल जगदाळे, कालिदास नीळ, निवृत्ती लोहार,आजिनाथ जगताप, व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
या उपोषणकर्त्याना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे, तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, आदिनाथ चे माजी संचालक दत्तात्रय जगदाळे, राष्ट्रवादीचे नेते प्रा गोवर्धन चवरे, भरिपचे नेते शहाजी ठोसर, सुदाम साळुंखे, भीम दलाचे अध्यक्ष महादेव भोसले, बहुजन परिषद राज्याचे उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे, क्रांती गुरु लहू सेनेचे अध्यक्ष शंकर मांढरे,व पूर्व भागांतील अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता. तसेच गावातील दोन्हीही प्रमुख पार्टीने जाहीर पाठिंबा दिला होता या सर्वांचे आभार हनुमंत जगताप नारायण जगताप यांनी मानले.

